शिर्डी: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होऊनही अद्याप खाते वाटपाची प्रतीक्षा आहे. १७ ऑगस्टच्या अधिवेशनाआधी खातेवाटप होण्याची शक्यता असून कोणाला कोणते खाते मिळणार याची उत्सुकता आहे. मंत्रिमंडळ विस्तारावेळी सर्वात प्रथम शपथ घेण्याचा मान मिळाल्याने भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना महत्वाचे असे महसूल किंवा सहकार खाते मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र राज्याच्या तिजोरीची किल्ली आता विखे पाटलांच्या हाती आल्याचे सूचक वक्तव्य भाजपनेते पाशा पटेल यांनी केले आहे.
विखे पाटलांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर शनिवारी त्यांचे शिर्डी मतदारसंघात आगमन झाले. शिर्डी विमानतळ ते लोणी दरम्यान त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. विखे पाटलांच्या लोणी गावात भव्य अशी मिरवणूक काढून ढोल-ताशांचा गजर आणि जेसीबीतून फुलांची उधळण करत भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित सत्कार समारंभासाठी अनेक मान्यवरांसह मराठवाड्यातील भाजप नेते पाशा पटेल देखील उपस्थित होते. जेव्हा खातेवाटप होईल तेव्हा तुमची काय अवस्था होईल? विखे पाटलांचा थोरातांना खोचक सवाल पुण्याहून नगरमार्गे लातूरकडे जात असताना, विखे पाटील मतदार संघात आल्याचे समजल्याने पाशा पटेल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी लोणी येथे आले होते. पटेल यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. पुढे बोलताना पाशा पटेल यांनी विखे पाटलांच्या मंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्राच्या तिजोरीची किल्ली आता विखे पाटलांकडे आली असल्याचे सूचक वक्तव्य पाशा पटेल यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका ‘अर्थ’ काय? याबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना महसूल किंवा अर्थ खाते मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याआधी विखे पाटलांनी शालेय शिक्षण, विधी व न्याय, जलसंधारण, परिवहन, कृषी व पणन, गृहनिर्माण अशी महत्त्वाची मंत्रीपदे भूषवली आहेत. मेटेंचा आवाज मराठा समाजाला न्याय मिळवून देईल असं नेहमी वाटायचं, उद्धव ठाकरे भावुक विखे पाटील यांचा अनुभव बघता भाजप सरकारमध्ये त्यांना महसूल किंवा सहकार मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पाशा पटेल यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने राधाकृष्ण विखे पाटलांना ‘अर्थ’ खाते मिळणार असल्याच्यादेखील चर्चा सुरू झाल्या असून समर्थकांच्या नजरा खातेवाटपाकडे लागल्या आहेत.