मुंबई: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचं खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान अशी खाती शिंदे यांनी स्वत:कडे ठेवली आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ आणि नियोजन, गृहनिर्माण अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे असलेली खाती आता भाजपनं आपल्याकडे घेतली आहेत. त्यामुळे शिंदे सरकारवर भाजपचं वर्चस्व असणार हे स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे खातेवाटपावर देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा आहे. मविआ सरकारमध्ये अजित पवारांकडे अर्थ, दिलीप वळसे पाटलांकडे गृह आणि जयंत पाटलांकडे जलसंपदा मंत्रालय होतं. ही सगळी महत्त्वाची खाती शिंदे सरकारमध्ये एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतील.
फडणवीसांकडून पवार पॅटर्न रिपीट; राज्याच्या राजकारणात पुन्हा तोच खेळ रंगणार?
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन विभागांची जबाबदारी होती. एकनाथ शिंदेंनी पर्यटन मंत्रालय भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिलं आहे. लोढा हे फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. सलग ६ वेळा आमदार राहिलेल्या लोढा यांना पहिल्यांदाच मंत्रिपद देण्यात आलं आहे.
चंद्रकांत पाटलांना धक्का; महत्त्वाची खाती फडणवीसांकडे, शिंदे गटाच्या अनेकांना प्रमोशन
आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्रिपदाची धुरादेखील सांभाळली होती. या खात्याची जबाबदारी आता खुद्द एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल. यासोबतच सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती आणि जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक या मंत्रालयांचा कार्यभारदेखील शिंदे यांच्याकडेच असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here