president’s medal announced : केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलिसांसह सुरक्षेयंत्रणेतील वेगवेगळ्या विभागातील पदकप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी १४ ऑगस्ट रोजी जाहीर केली. जळगाव पोलीस दलातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रदीप पंढरीनाथ चांदेलकर, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार विजय देवराम पाटील, माणिक सोनाजी सपकाळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सुरेश पंडित पाटील व मोटार वाहन विभागाचे प्रदीप राजाराम चिरमाडे यांचा त्यात समावेश आहे.

 

presidents medal announced to 5 police officers and police personnel in jalgaon
जळगाव पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा, ५ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

हायलाइट्स:

  • जळगाव पोलीस दलातील ५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर.
  • जळगाव पोलिस दलात आनंदाचे वातावरण.
  • उद्या स्वातंत्र्यदिनादिवशी केले जाणार बहाल.
जळगाव : पोलीस दलात उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पाच जणांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. पोलीस कवायत मैदानावर आज सोमवारी मंत्र्यांच्या हस्ते हे पदक बहाल केले जाणार आहेत. (President’s medal announced to 5 police officers and police personnel in Jalgaon)

केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलिसांसह सुरक्षेयंत्रणेतील वेगवेगळ्या विभागातील पदकप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी १४ ऑगस्ट रोजी जाहीर केली. जळगाव पोलीस दलातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रदीप पंढरीनाथ चांदेलकर, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार विजय देवराम पाटील, माणिक सोनाजी सपकाळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सुरेश पंडित पाटील व मोटार वाहन विभागाचे प्रदीप राजाराम चिरमाडे यांचा त्यात समावेश आहे.

क्लिक करा आणि वाचा- मंत्री गुलाबभाऊ, तुमच्या कार्यकर्त्यांचं हे वागणं ओक्के हाय का ?; जीवघेण्या स्टंटबाजीची चर्चा

पोलीस कवायत मैदानावर सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात या सर्व पदकप्राप्त पोलीस अधिकारी, अमलदारांचा मंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. जळगावमधील पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यामुळे जळगाव पोलीस दलात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

क्लिक करा आणि वाचा- माझं कुणी काही वाकडं करु शकत नाही, तिसरा डोळा उघडला तर… : गुलाबराव पाटील
क्लिक करा आणि वाचा- तरुणाला घातली गोळी मग बहिणीचा आवळला गळा; सख्ख्या भावाने केला धक्कादायक प्रकार

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here