समुपदेशनानंतर पती पत्नीसोबत राहण्यास तयार झाला. न्यायमूर्तींसमोर त्यानं सोबत राहण्याची तयारी दर्शवली. पत्नीला घेऊन पती न्यायालयातून बाहेर पडला. त्यानंतर त्यानं पत्नीवर हल्ला केला. तिचा गळा कापला. त्यामुळे एकच खळबळ माजली.

दोन मुलांकडे पाहून आपण पत्नीसोबत झालेले मतभेद बाजूला ठेवू असं आश्वासन शिवकुमारनं न्यायालयाला दिलं. यानंतर शिवकुमार चित्राला घेऊन न्यायालयातून निघाला. चैत्रा शौचालयात जात असताना शिवकुमारनं मागून तिचा गळा कापला. पत्नीवर वार केल्यानंतर शिवकुमारनं त्यानं आपल्या मुलांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे असलेल्या लोकांनी त्याला रोखलं.
पत्नीवर वार केल्यानंतर शिवकुमारनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही जणांनी त्याला मागून पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. चैत्राला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.