lover murders his girlfriend : ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी संध्याकाळच्या सुमारास २२ वर्षीय एका गर्भवती तरुणीचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली होती. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी या प्रकरणी एक पथक तयार करून तपासाला सुरुवात केली होती.

हायलाइट्स:
- प्रियकराने केली प्रेयसीची हत्या.
- प्रेयसी होती गर्भवती.
- निर्जन स्थळी बोलावून केले कृत्य.
ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी संध्याकाळच्या सुमारास २२ वर्षीय एका गर्भवती तरुणीचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली होती. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी या प्रकरणी एक पथक तयार करून तपासाला सुरुवात केली होती. या प्रकरणाचा संपूर्ण तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक कृपाली बोरसे यांच्याकडे होता. तपास सुरु असताना या मयत तरुणीचे नाव मुस्कान उर्फ नादिया मजीद मुल्ला असल्याचे निष्पन्न झाले.
या तरुणीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून विचारपूस केली असता मुस्कान हिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. अल्तमश मुनोवर दळवी असे या प्रियकराचे नाव असून त्याचा तपास पोलिसांनी सुरु केला. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरु केला असता हा प्रियकर पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मुंब्रा पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रियकर अल्तमश मुनोवर दळवी याला ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाहेरून ताब्यात घेतले.
या प्रकरणी प्रियकर अल्तमश मुनोवर दळवी याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. सखोल चौकशी केली असता प्रियकर अल्तमशचे मुस्कान सोबत प्रेमसंबंध होते आणि त्याच प्रेम संबंधातून मुस्कान ही गर्भवती झाली होती. या कारणावरून अल्तमश आणि मुस्कान यांच्यात वाद निर्माण होऊ लागले. याच वादातून अल्तमशने मुस्कानला मुंब्रा बायपास जवळील निर्जळ स्थळी भेटण्यासाठी बोलावले आणि संधी पाहून चाकूच्या सहाय्याने गळा चिरून तिची हत्या केल्याची कबुली त्याने मुंब्रा पोलिसांना दिली. त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी अल्तमशच्या विरोधात भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.