श्रीनगरः दहशतवादी शाहनवाज याच्या कुटुंबीयांनी ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमांतर्गत घरावर राष्ट्रध्वज फडकावला आहे. शाहनवाज याचे कुटुंबीय अजूनही भारतात राहतात. त्याच्या या कृतीने सारेच आश्चर्यचकित झाले आहेत. यावेळी शाहनवाजच्या वडिलांनी त्याला एक संदेशही दिला आहे. ()

रविवारी शाहनवाजच्या कुटुंबीयांनी घरी राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी शाहनवाजला एक महत्त्वाचा संदेशही दिला. मुलाने दहशतवादाचा मार्ग सोडून पुन्हा भारतात यावे, अशी शाहनवाजच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. आमचं सगळं हिंदुस्तानात आहे. पाकिस्तानशी आमचा कोणाताही संबंध नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

शाहनवाज कंठचे २२ वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर त्याला प्रशिक्षण देत दहशतवादी बनवले होते. आपला मुलगा पुन्हा भारतात परतावा व त्याने दहशतवादाच्या दलदलीतून बाहेर पडावे, अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आजच्या अमृत महोत्सवी दिनाच्या निमित्ताने त्यांनी शाहनवाजला पुन्हा परतण्याचे आवाहन केलं आहे.

वाचाः
किश्तवाडयेथील हुलर गावात राहणारे अब्दुल रशीद कंठ आणि त्यांचा दुसरा मुलगा नवाज कंठ यांनी रविवारी नगर परिषदचे अध्यक्ष सज्जाद यांना फोन करुन तिरंगा देण्यास सांगितलं. नगर परिषद अध्यक्ष सज्जाद हे यांनी तिरंगा दिल्यानंतर कुटुंबीयांसोबत घरावर मोठ्या दिमाखात ध्वजारोहण केले.

२०००मध्ये दहशतवादी शाहनवाजला घेऊन गेले होते. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता नव्हता. २०१५पर्यंत कधीतरी त्यांच्याशी संपर्क होत होता. मात्र, त्यानंतर आजपर्यंत त्यांच्यासोबत काहीच संपर्क झालेला नाही. आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी आम्ही आमच्या मुलाला परत येण्याचं अवाहन करत आहोत. असं, शाहनवाजचे वडील अब्दुल रशीद कंठ यांनी म्हटलं आहे.

वाचाः
दरम्यान, जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी १९वर्षीय तरुणाला अटक रविवारी अटक केली. हा तरुण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील हँडलर्ससोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हबीबुल इस्लाम उर्फ सैफुल्ला असे या तरुणाचे नाव आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या महंमद नदीम (वय २५) याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे ‘एटीएस’ने केलेल्या तपासादरम्यान हबीबुल इस्लामपर्यंत पोलिस पोहोचले. हे दोघेही जैश-ए-महंमदशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here