चंद्रपूर : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष (Happy Independence Day 2022) आज देशभर साजरा होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्य लढ्याचे अनेक प्रसंग आज डोळ्यांसमोर येतात. अनेकांनी या लढ्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. अशा अनेक वस्तू आहेत ज्या आपल्या ऐतिहासिक क्षणांची साक्ष देतात. आम्हीही तुम्हाला अशाच ऐतिहासिक नाण्यांबद्दल आणि एका महान राजाबद्दल सांगणार आहोत. भारताच्या इतिहासात असा एक राजा झाला ज्याचा राज्यकारभार फक्त ८९ दिवसाचा ठरला. मात्र, या कमी दिवसात राजानं असं काही केलं की त्याचं नाव इतिहासात अमर झालं. आजच्या या दिनी या जुन्या नाण्यांचे खास फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. (By Writing “Jai Hind” King Became Immortal, Read About historical Coins And A Great King)

happy 75th independence day स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

happy-75th-independence-day-

​जय हिंद लिहून तो राजा अमर झाला…

आपल्या राज्यातील सोने, चांदी आणि तांब्याच्या चलणावर या राजानं ‘जय – हिंद’ कोरलं. या राजाचे नाव आहे महाराव मदन सिंह. राजा महाराव मदन सिंह हे गुजरात येथील कच्छ येथील राजा होते. त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या ही दुर्मिळ नाणी चंद्रपूरातील नाणी संग्राहक अशोक सिंह ठाकूर यांच्या संग्रही आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव देशभरात उत्साहानं साजरा केला जात आहे. त्या दिवशी देशवासियांसाठी ही खास आठवण.

​भारत देशातील एका राजाचे स्मरण

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शहिदांनी बलिदान दिलं. त्यांचं स्मरण स्वातंत्र्य दिनी केलं जातं. याच वेळी भारत देशातील एका राजाचे स्मरण न कळत होते. तसं बघितलं तर या राजाचे स्वातंत्र्य लढ्याशी सबंध नाही. मात्र, या राजाचा एका कामगीरीने इतिहासात राजाचे नाव ठळक अक्षरात लिहिले गेले. गुजरात राज्यातील कच्छ येथील जाडेजा राज घराण्यातील महाराव मदन सिंह यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९०९ आणि मृत्यू २१ जून १९९१ रोजी झाला.

​गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल

या राजाच्या मालकीचे शरदबाग, पराग महल आणि आयना महल हे तीन महाल त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तूंसह ट्रस्टमध्ये रूपांतरित केले आणि ते लोकांसाठी खुले केले. विजयराज जाडेजा यांचा मृत्यू २६ जानेवारी १९४८ साली झाला. त्यांचा मृत्यूनंतर मदन सिंह राजा झाला. मदन सिंह यांच्या कार्यकाळ २६ फेब्रुवारी १९४८ ते १ जून १९४८ असा आहे. अवघे ८९ दिवस ते राजा राहिले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली संस्थानांचे विलीनीकरण झाले.

​८९ दिवसांच्या कार्यकाळात अनोखा निर्णय…

या विलिकरणाचा दरम्यान विजयराल जाडेजा यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कच्छ विलीनीकरण राहून गेले. यानंतर मदन सिंह राजा झाले. ८९ दिवसांच्या कार्यकाळात त्यांनी सोने, चांदी आणि तांब्याची नाणी काढली. या नाण्यावर ‘जय-हिंद’ लिहले. मदन सिंहाचे राज्य स्वतंत्र भारतात विलीन झाले. मात्र, ती नाणी इतिहासात अजरामर झाली आहे. ही दुर्मिळ नाणी चंद्रपूर येथील नाणी संग्राहक तथा अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांच्याकडे सग्रहित आहेत.

​पाहा जय हिंद लिहलेल्या या नाण्यांचे फोटो…

तुम्ही पाहू शकता ही नाणी कशा प्रकारे आहेत. ही अतिशय जूनी नाणी असून यावर जय हिंद असं लिहण्यात आलं आहे. खरंतर, हा आपला ऐतिहासिक खजिना आहे. त्यामुळे याचे संवर्धन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here