shivsen leader dada bhuse, दुय्यम खाते मिळाल्याने मुख्यमंत्री शिंदेंवर नाराजी? खातेवाटपानंतर दादा भुसे यांची पहिली प्रतिक्रिया – shivsena leader dada bhuse first reaction on state cabinet portfolio and cm eknath shinde
धुळे : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांचे खातेवाटपही जाहीर केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषीमंत्री राहिलेल्या दादा भुसे यांना शिंदे सरकारमध्ये दुय्यम दर्जाचे मंत्रिपद दिल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे भुसे यांना कालपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र त्यांचा फोन बंद असल्यामुळे त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नव्हता. अखेर आज दादा भुसे यांनी धुळे येथे बोलताना खातेवाटपावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
‘यापूर्वी मिळालेल्या कृषी विभागात काम करत असताना वारंवार होणारा प्रवास, अवकाळी पावसामुळे प्रत्येक ठिकाणी नुकसानी संदर्भात पोहोचताना होणारा त्रास लक्षात घेत मीच हे खातं नको, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही तेव्हा सांगितलं होतं आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनाही तेच सांगितलं. त्यामुळे मला मिळालेल्या नव्या खात्याबाबत मी समाधानी आहे,’ असा खुलासा दादा भुसे यांनी केला आहे.
दरम्यान, दादा भुसे यांनी शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाबाबतही भाष्य केलं आहे. ‘शासनातर्फे नियम बनवले जातातच परंतु, नियमांचे आपण पालन किती करतो याचे आत्मचिंतन करण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे,’ असं सांगत मंत्री दादा भुसे यांनी अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणं देखील तितकंच आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.