Narendra Modi Independence Day speech | ज्यांच्यामध्ये कुवत नाही, ताकद नाही, कर्तृत्व नाही, नेतृत्त्व नाही, अशांना बळजबरीने पदावर बसलं तर त्याला घराणेशाही म्हणू शकता. पण एखाद्या घरामध्ये जन्माला आलेली पुढची पिढी ही कर्तृत्त्ववान असेल, त्यांच्या भागातील जनतेने त्यांना आमदार-खासदार केलं, तर त्याला घराणेशाही म्हणणे चुकीचे ठरेल, असे अजित पवार यांनी म्हटले.

हायलाइट्स:
- कौटुंबिक राजकारणाच्या मानसिकतेविरोधात लढा देण्याची गरज
- घराणेशाही कोणीही आणू शकत नाही
- जनतेने त्या लोकांना निवडून दिलं तर लोकशाहीत ते निवडून जाऊ शकतात
यावेळी अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्याविषयी विचारण्यात आले. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, घराणेशाही कोणीही आणू शकत नाही. जनतेने त्या लोकांना निवडून दिलं तर लोकशाहीत ते निवडून जाऊ शकतात. घराणेशाही संपवली पाहिजे, असे बोलले जाते. पण जनतेने निवडून दिलं तरच घराण्यातील लोक निवडून येतात. नेहरूंच्या पंतप्रधानांच्या कारकीर्दीनंतर इंदिरा गांधी यांनी देशाची सूत्रे हाती घेतली. इंदिरा गांधी यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यांनी भारतात संगणक युग आणले, मिस्टर क्लीन अशी त्यांची प्रतिमा होती. घराणेशाही-घराणेशाही असं म्हटलं जातं. ज्यांच्यामध्ये कुवत नाही, ताकद नाही, कर्तृत्व नाही, नेतृत्त्व नाही, अशांना बळजबरीने पदावर बसलं तर त्याला घराणेशाही म्हणू शकता. पण एखाद्या घरामध्ये जन्माला आलेली पुढची पिढी ही कर्तृत्त्ववान असेल, त्यांच्या भागातील जनतेने त्यांना आमदार-खासदार केलं, तर त्याला घराणेशाही म्हणणे चुकीचे ठरेल, असे अजित पवार यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणालेय़
काका-पुतण्या आणि कौटुंबिक राजकारणाच्या मानसिकतेविरोधात लढा देण्याची गरज आहे. मी घराणेशाहीविरोधात बोलतो तेव्हा लोकांना वाटतं की, मी फक्त राजकीय विधानं करतो. पण तसं नसून घराणेशाहीच्या आणि काका-पुतण्याच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान होत आहे. घराणेशाहीच्या राजकारणामुळे कुटुंबांना पोसलं जातं. या दुर्भाग्यपू्र्ण्य परिस्थितीचा भारताला फटका बसत आहे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network