अहमदनगर: राज्यात सत्ताबदल होताच नगरच्या राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या दोन राजकीय नेत्यांमध्ये आता नव्याने कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांची महसूल मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. महसूल खात्याची सूत्रे हाती घेताच विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी गेल्या सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या निर्णयांची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. ठाकरे सरकारच्या काळात महसूल खात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे होते. त्यामुळे आता विखे-पाटलांकडून महसूल खात्यातील पूर्वीच्या निर्णयांच्या चौकशीद्वारे बाळासाहेब थोरात यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नगरच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात नव्याने द्वंद्व रंगण्याची शक्यता आहे.
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची घराणेशाहीवर टीका, अजितदादांचं तात्काळ प्रत्युत्तर , म्हणाले…
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मागील काळात महसूल खात्यामध्ये काय घडले आहे, याची चौकशी करावी लागेल. मात्र, येणाऱ्या काळामध्ये पूर्वीसारखे आरोप होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. भ्रष्टाचारमुक्त सरकार हाच अजेंडा या सरकारचाच आहे, असेही विखे-पाटील यांनी म्हटले. यावेळी विखे-पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई संदर्भातही भाष्य केले. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असे विखे-पाटील यांनी म्हटले.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहमदनगरच्या पोलीस परेड ग्राउंडवर ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. विनायक मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाचे कधी न भरून येणार नुकसान झाले आहे. एक उमदे नेतृत्व हरवले आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे त्यांचे स्वप्न अधुरंच राहिलं. मराठा समाजासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या विनायक मेटे यांना अहमदनगर जिल्ह्याच्यावतीने विखे-पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.
दुय्यम खाते मिळाल्याने मुख्यमंत्री शिंदेंवर नाराजी? खातेवाटपानंतर दादा भुसे यांची पहिली प्रतिक्रिया

बिनखात्याचे मंत्री! बाळासाहेब थोरातांची खोचक टीका

शिंदे-फडणवीस सरकारने राधाकृष्ण विखे-पाटील यांना फक्त मंत्रिपद मिळाले होते, तेव्हा त्यांना शाब्दिक चिमटा काढला होता. बाळासाहेब थोरात यांनी विखे-पाटलांना बिनखात्याचे मंत्री म्हणून हिणवले होते. त्याला विखे-पाटलांनी चोख प्रत्युत्तर दिले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगर जिल्ह्यात तीन मंत्री असताना त्यांनी कोणता प्रकल्प जिल्ह्यात आणला? केवळ वाळू उपसायची, हा एकच उद्योग नगर जिल्ह्यात सुरू होता. आता सत्ता गेल्याने जलबिना मछली अशी अवस्था झाल्याने ते तडफडत आहेत. आपल्या जिल्ह्यातील एक वरिष्ठ मंत्री होते, ते आमच्यावर बिनखात्याचे मंत्री झेंडावंदन करणार असल्याची टीका करत आहेत. मात्र त्यांनी आमची चिंता करू नये. ज्यावेळी खातेवाटप होईल त्यावेळी तुमची काय अवस्था होईल याचा पहिल्यांदा विचार करा, अशा शब्दांत विखे-पाटील यांनी थोरांतावर निशाणा साधला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here