अमरावती : अमरावती शहरात सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आले आहेत. शिल्लक वादातून दोन दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आल्याची घटना ताजी असताना आज स्वातंत्र्यदिनीच पुन्हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शहरातील लक्ष्मीनगर परिसरात आज सकाळच्या सुमारास अचानक पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार राजेश रावत नामक इसमाला पकडण्यासाठी अकोला पोलीस अमरावतीत आले होते. दरम्यान आरोपीने थेट पोलिसांवर गोळ्या झाडल्या. सुदैवाने यात पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले आहेत. एकीकडे देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असताना अमरावती घडलेल्या गोळीबाराच्या या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली.

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची घराणेशाहीवर टीका, अजितदादांचं तात्काळ प्रत्युत्तर , म्हणाले…

पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी आरोपीने गोळीबारानंतर भरधाव वेगात गाडीतून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची गाडी एका खांबाला धडकली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करत त्याच्याविरुद्ध कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, गोळीबाराच्या या घटनेनं शहरात काही काळासाठी खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याने सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here