नवी दिल्ली: संपूर्ण देशात आज ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. देशातील प्रत्येक नागरिक उत्साहाने अमृतमहोत्सवी स्वतंत्र्य दिन साजरा करताना दिसतोय. सामान्य नागरिकांपासून ते स्टार आणि सेलिब्रेटी देखील यात सहभागी झालेत. काही जण घरावर झेंडा लावून तर काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. अशात भारताच्या एका क्रिकेटपटूची पत्नीची पोस्ट चर्चेत आली आहे.

भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीना जहाँ नेहमी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. हसीनाने सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर करत असते. त्याच बरोबर शमी सोबतच्या वादामुळे देखील ती अनेकदा चर्चेत येते. आता मात्र हसीना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

वाचा- रेकॉर्डवर रेकॉर्ड मोडतोय भारताचा क्रिकेटपटू; चेतेश्वर पुजारा साजरा करतोय फॉर्मचा अमृतमहोत्सव

हसीनाने स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही एक व्हिडिओ पोस्ट आहे, ज्यात हसीनाने स्वातंत्र्य दिनासाठी नृत्य केले आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना एक विनंती केली आहे. हसीना म्हणते की, आपला देश, आपला अभिमान. भारतावर माझे प्रेम आहे. आपल्या देशाचे नाव हिंदुस्थान किंवा भारतच असायला हवे असे म्हणून हसीनाने इंडिया हे नाव बदलण्याची मागणी केली आहे. यामुळे संपूर्ण जग आपल्या देशाला भारत किंवा हिंदुस्थान या नावाने ओळखेल.


गेल्या काही वर्षापासून हसीना ही पती मोहम्मद शमीसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. हसीने सध्या शमी सोबत राहत नाही. तिने शमीवर मारहाणी सारखे गंभीर आरोप केले होते. शमीने अद्याप हसीनाच्या कोणत्याही आरोपांना उत्तर दिलेले नाही. नुकतेच शमीने मुलीला १०० रुपयांचे ड्रेस पाठवल्याचे आरोप हसीनाने केलाय. सध्या आपल्या एका बंगाली चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शमीसंबंधी प्रश्न विचारल्यावर हा आरोप तिने केला आहे.

वाचा- कोट्यधीश बापाकडून लेकीला १०० रूपयांचा ड्रेस? शमीची बायको भडकली, म्हणाली…

मोहम्मद शमीची मुलगी ‘आईरा’ आता मोठी झाली आहे. शाळा, क्लास इतर दैनंदिन गोष्टी करत असताना ती तिच्या वडिलांविषयी विचारपूस करते. ती आता शमीसोबत संपर्क करण्याचाही प्रयत्न करते. हसीनने शमीवर आरोप केला आहे की, शमीने आजतागायत मुलीला एकही गिफ्ट दिलेले नाही. ईदला देखील तो आपल्या मुलीला कपडे किंवा गिफ्ट पाठवत नसल्याचं हसीनने संगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here