सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या निर्णयावर आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुनगंटीवारांच्या सरकारी कार्यालयात फोनवर ‘नमस्कार’ करण्याऐवजी ‘वंदे मातरम’ बोलायचं या निर्णयाला रजा अकादमीने विरोध केला आहे. शिंदे फडणवीस सरकारचं खातेवाटप काल जाहीर झालं. या खातेवाटपात सुधीर मुनगंटीवार यांना वनखात्याबरोबर सांस्कृतिक कार्य हे खातं सोपवलं गेलं. मुनगंटीवारांनी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्याबरोबर पुढच्या चार तासांत हा महत्त्वाचा निर्णय घेतला.
आजपर्यंत इंग्रजांनी दिलेला शब्द उपयोगात आणला आहे. मी फोन उचलल्याबरोबर ”हॅलो” म्हणतो हा देश जेव्हा गुलामगिरीत होता, तेव्हा त्यांनी हा शब्द दिलेला होता. स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम म्हणत तिरंगा हातात घेऊन, या देशाचं स्वातंत्र्य मंगलकलशाच्या रुपाने दिलं. पण अजूनही इंग्रजांची छाप काही कमी होत नाही. म्हणून आज सांस्कृतिक विभागाच्या मंत्रालयाचा मंत्री म्हणून पहिला निर्णय जाहीर करतोय, आता हॅलो नाही… वंदे मातरम बोलायचं….!
४७ वर्षांपूर्वीच्या ‘आंधी’ने उद्ध्वस्त केलं राखी- गुलजारांचं आयुष्य