बीड : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचं रविवारी सकाळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर अपघाती निधन झालं. याच अपघातावेळी मेटेंचे अंगरक्षक राम ढोबळेही गंभीर जखमी झाले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोलनाक्याजवळ मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विनायक मेटे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी मेटे यांना मृत घोषित केले.

राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय असणाऱ्या विनायक मेटे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या अपघाताबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. त्यांच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते राजकारणातील नेता असा त्यांचा संघर्षय प्रवास होता.

ध्वजारोहण सोहळ्यात महिलेचा धक्कादायक प्रकार, स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतलं
विनायक मेटे यांच्याबद्दल सांगताना त्यांच्या आईंचे डोळेही पाणावले. सगळ्या मुलांमध्ये विनायक लाडके असंही त्या म्हणाल्या. माध्यमांशी बोलताना त्यांनी विनायक मेटेंच्या संघर्षमय प्रवासाबद्दल माहिती दिली. रोजच्या आयुष्यात व्यस्त असले तरी ते गावाकडील लोकांशी नेहमी संपर्कात असायचे. १३ ऑगस्टला मुंबईला येण्याआधी ते गावी आईची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यांनी गावी आईसाठी नवं घर बांधलं आहे. २२ तारखेला या घराचा गृहप्रवेश होता. पण त्याआधीच विनायक मेटेंचा असा अकाली मृत्यू झाला.

मेटेंच्या अशा अकाली जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबियालाही मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या कारला झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत. या चौकशीत नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या जालन्यातल्या ‘त्या’ कंपनीत बनतं तरी काय? झाला उलघडा, वाचा Inside Story

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here