Independence Day Aaditya Thackeray | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना महिलांना आदर देण्याची भाषा केली होती. त्यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मोदींना प्रत्युत्तर दिले. मोदींनी प्रथम केंद्रात महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करावं, असे पेडणेकर यांनी म्हटले. किशोरी पेडणेकर या सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

हायलाइट्स:
- मुंबईतील शिवसेना भवनात ५० व्या स्वातंत्र्यदिनाला बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
- आज ७५ व्या स्वातंत्र्यदिनाला उद्धव ठाकरे यांनी ध्वजारोहण केले
- स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा आदित्य ठाकरे दिल्लीतून इकडे येतील
त्यावेळी किशोरी पेडणेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत महत्त्वाचे भाकीत केले. मुंबईतील शिवसेना भवनात ५० व्या स्वातंत्र्यदिनाला बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले होते. आज ७५ व्या स्वातंत्र्यदिनाला उद्धव ठाकरे यांनी ध्वजारोहण केले. आता स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन शिवसेना भवनात झेंडावंदन करतील, हे लिहून ठेवा, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. महाराष्ट्र आणि देशात राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे. शिवसेना पक्ष हा कौटुंबिक पक्ष आहे. हा पक्ष समाजकारण करत करत मोठा झालेला पक्ष आहे, सामाजिक भावना ठेवून काम करणारा पक्ष असल्याचेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेतील २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकू: आशिष शेलार
पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात देशातील भ्रष्टाचारी आणि घराणेशाहीचा समूळ नायनाट करण्यास सांगितले आहे. घराणेशाहीमुळे सामान्य नागरिकांच्या गुणांना मर्यादा पडतात. या दोन्ही गोष्टी मुंबईतील जनतेच्या मनात आहेत. मोदीजी मुंबईकरांच्या मनातील गोष्ट बोलले. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मुंबईतील भ्रष्टाचाराची बजबजपुरी उखडून फेकली पाहिजे. त्यासोबत मुंबईतील भ्रष्टाचारी राजवट उलथवून टाकली पाहिजे. २५ वर्षे एकाच परिवाराच्या हातात सत्ता आहे. मी नाहीतर माझा पुत्र अशा पद्धतीने कारभार सुरु असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network