सापाला पाहून अनेकांची भीतीनं गाळण उडते. मात्र एका २ वर्षांच्या चिमुरडीचा कारनामा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका सापानं चिमुरडीला दंश केला. त्यामुळे चिमुकली संतापली. तिनं दातानं सापाचा चावा घेतला आणि त्याचे दोन तुकडे केले.

तुर्कस्तानच्या एका गावात ही घटना घडली. दोन वर्षांच्या मुलीची किंकाळी ऐकून शेजारी तिच्या घरी पोहोचले. त्यावेळी तिथे असलेलं दृश्य पाहून शेजाऱ्यांना धक्का बसला. चिमुकलीच्या तोंडात जवळपास अर्धा मीटर लांबीचा एक साप होता. तिच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर सर्पदंशाच्या खुणा होत्या.
पैसे हातात ठेवा, डबल करतो! साधू बनून चमत्कार करायला गेले, त्यांच्यासोबत भलताच प्रकार घडला
शेजाऱ्यांनी मुलीच्या तोंडातून साप काढून घेतला आणि तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. तिथे तिला २४ तास निगराणीखाली ठेवण्यात आलं. चिमुकलीची प्रकृती आता स्थिर असून तिच्या जीवाला आता कोणताही धोका नाही. ही घटना १० ऑगस्टला घडली. मात्र तिची चर्चा सोशल मीडियावर आता होत आहे.
१५ साप, ५ अजगर, २ कासवं, १ माकड! एअरपोर्टवर प्रवाशाला अडवले; बॅगेत दुर्मीळ प्राणी सापडले
चिमुकली खेळत असताना साप तिच्या जवळ पोहोचला. मुलगी सापाला खेळणं समजून त्याच्याशी खेळू लागली. यादरम्यान सापानं तिच्या ओठांजवळ दंश केला. यानंतर चिमुकलीनं सापाचा चावा घेतला. त्यात सापाचा मृत्यू झाला. मुलीनं चावा घेतल्यानं सापाचे जवळपास दोन तुकडे झाले. घटना घडली त्यावेळी मुलीचे वडील कामासाठी बाहेर गेले होते. घरी परतल्यावर त्यांना झालेला प्रकार समजला. त्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here