१२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते रात्री १० दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास धारणी पोलिसांनी आरोपी प्रदीप बाबू कासदेकर (२५, रा. कुटंगा, ता. धारणी) याच्याविरुद्ध पळवून नेणे, बलात्कार अनैसर्गिक अत्याचार व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, आरोपी प्रदीपने त्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. तो तिला एका शिवारात घेऊन गेला. तेथे तिच्याशी शारीरिक बळजबरी करण्यात आली. तर, मुलगी घरी न परतल्याने तिचे कुटुंब चिंताग्रस्त झाले. अखेर रात्री १०च्या सुमारास आरोपीच्या तावडीतून सुटून अल्पवयीन पीडितेने घर गाठले. पालकांकडे घडलेली सर्व घटना सांगितली.
घनदाट जंगल आणि वेडलेल्या चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील या भागात सातत्याने महिलावर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. यातील अनेक गावांमध्ये अद्यापही वीज पोहोचली नसून बसही अनेक गावात पोहोचलेली नाहीये त्यामुळे खाजगी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे अशातच अनेक प्रवासी या खाजगी वाहनांमधून प्रवास करत असतात त्यामुळे अशा रात्रीच्या वेळी प्रवास टाळावा. कारमधून लिफ्ट घेताना परिचित असल्यासच पुढचा प्रवास करावा अन्यथा करू नये त्यामुळेच या घटनांना आळा बसेल असे आवाहन पोलिसांनी केले आहे.