अमरावती : भंडारा येथील महिलेवर अत्याचाराची घटना ताजी असताना अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पोलीस ठाणे हद्दीतील एका लिफ्ट मागणाऱ्या मनोरूग्ण महिलेला गाडीवर बसून जंगलात नेत सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १२ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली असून पीडित महिलेच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीमाडोह येथील महिला मुख्य चौकावर उभी होती. दरम्यान महिलेला सुनील दहिकर आणि तुकाराम नानकराम धांडे यांनी बाईकवर बसवलं आणि तिला जंगलात घेऊन गेले तिच्यावर या दोघांनी आळीपाळीने अत्याचार केला. पिली गावाजवळ असलेल्या जंगलात नराधमाने हे भयंकर कृत्य केलं आहे. पीडिता ही २० वर्षाची असून तीचं लग्न झालं होतं. नवरा-बायकोचं पटत नसल्याने तिच्या पतीने तिला माहेरी आणून सोडले होते. शुक्रवारी रात्री शेमाडो येथील चौकात ही महिला उभी असताना दोघांनीही तिच्यावर अतिप्रसंग केल्याचं समोर येत आहे.

महाराष्ट्राला हादरवणारी घटना, औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांचा बलात्कार
घटनेनंतर जखमी झालेल्या महिलेवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर चिखलदरा पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयित आरोपी असलेल्या सुनील आणि तुकाराम या दोघांना अटकही करण्यात आली आहे. सध्या या दोघांचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे चिखलदरा परिसर हादरून गेला असून संपूर्ण अमरावतीत खळबळ उडाली आहे.

पहाटे ३ ला उठला, सहा महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गळा चिरला, मग थेट पोलीस ठाण्यात पोहोचला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here