नवी दिल्ली : सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वाला एका सामन्याची सर्वात जास्त उत्सुकता असेल. हा सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांमध्ये आशियाच चषक स्पर्धेत २८ ऑगस्टला होणार आहे. या सामन्याच्या तिकिटींसाठी चाहत्यांच्या उड्या पडणार आहेत. पण या सामन्याची तिकिटं कुठे मिळू शकतात आणि त्यांची अंदाचे किमत काय असेल, याची माहिती आता समोर आली आहे.

आशियाच चषक स्पर्धेतील सामन्यांच्या तिकिटांचे भाव हे शहरांनुसार असणार आहेत. दुबईतील तिकीटं महाग तर शाहजामधील तिकिटं त्या मानाने स्वस्त आहेत. दुबईतील सामन्याचे कमी कमी किंमतीचे तिकीट हे ७५ दिरहम एवढे असणार आहे, भारताच्या रुपयांमधील त्याची किंमत ही १६२५ रुपये एवढी असणार आहे. पण शारजामध्ये मात्र यापेक्षा स्वस्त तिकीटं मिळणार आहेत. शारजामध्ये कमीत कमी तिकीट हे ३५ दिरहम एवढे असणार आहे, भारतीय रुपयांनुसार त्याची किंमत ही ७५० रुपये एवढी असणार आहे. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिकिटांचे भाव मात्र सर्वात जास्त असणार आहेत. या सामन्यासाठी सर्वात कमीत कमी किंमतीचे तिकिट हे जवळपास ४ हजार रुपयांपर्यंत असेल. पण जस जसा सामना जवळ येईल तशी या सामन्यांच्या तिकीटांचे भाव गगनाला भिडतील. पण या तिकीटी कुठे मिळतील, याची माहितीही आता समोर आली आहे.

आशियाच क्रिकेट कौन्सिलने याबाबत एक ट्विट केले आहे. यामध्ये या स्पर्धेच्या तिकीट्स कुठे आणि कशा मिळू शकतात, याची माहिती दिली आहे आणि याबाबतची लिंकही शेअर केली आहे. आशियाच चषकाच्या वेब साईटवर गेल्यावरही याबाबतची माहिती तुम्हाला मिळू शकते. आशिया चषकासाठी तिकिट मिळवण्यासाठी आजपासूनच सुरुवात करण्यात आली आहे. आज १५ ऑगस्टला मुहूर्त साधत चाहत्यांसाठी तिकीटांची ऑनलाइन विक्री सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून चाहते या साइट्सवर झुंबड करतील. पण यावेळी सर्वात जास्त तिकीटांची मागणी ही भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या २८ ऑगस्टच्या सामन्याची असेल, यामध्ये काहीच शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here