चेन्नई: झेंडावंदनानंतर शाळेतून घरी परतणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीला बसनं चिरडलं आहे. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून विद्यार्थिनी घरी परतत होती. ही विद्यार्थिनी नेलिमिचेरी परिसराची रहिवासी असून लक्ष्मीश्री असं तिचं नाव आहे.

स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर लक्ष्मीश्री तिच्या मैत्रिणीसह सायकलवरून घरी परतत होती. सकाळी १० च्या सुमारास दोघी हस्तीनापुरम येथून जात होत्या. त्यावेळी सरकारी बसनं लक्ष्मीश्रीला चिरडलं. बसनं लक्ष्मीश्रीला मागून धडक दिली. त्यामुळे लक्ष्मीश्रीचा तोल गेला. ती बसच्या मागच्या चाकाखाली आली. जागीच तिचा मृत्यू झाला.
पैसे हातात ठेवा, डबल करतो! साधू बनून चमत्कार करायला गेले, त्यांच्यासोबत भलताच प्रकार घडला
संपूर्ण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामध्ये दोन मुली सायकलवरून जाताना दिसत आहेत. त्यांच्या मागून बस येते. ती एका मुलीला चिरडते, असा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघातानंतर बसच्या चालकानं तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली.
घटस्फोटाचा अर्ज, फॅमिली कोर्टानं समजावलं; बाहेर येताच पतीनं टोकाचं पाऊल उचललं
आरोपी चालकावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी स्थानिकांना दिलं. रस्त्याच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांमुळे असे अपघात होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला. रस्त्याजवळची अतिक्रमणं आणि पार्किंग करण्यात आलेली वाहनं हटवल्यास अपघात टाळता येतील, असं स्थानिकांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here