प्रबुद्ध नगर येथे सम्राट तायडे हा आपल्या मित्रांसोबत डीजेच्या गाण्यांवर नाचत होता. त्यानंतर तिथे एका अज्ञात युवकाने सम्राटवर हल्ला करत पाठीत चाकू खुपसाला आणि त्या ठिकाणाहून पसार झाला. चाकू थेट श्वसन नलिकेपर्यंत पोहोचल्याचे एक्स-रेमध्ये निष्पन्न झाल्याने त्याला तातडीने नागपूरला हलवण्यात आलं. अचानक चाकू काढल्यास मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो आणि सम्राटचा जीव देखील जाऊ शकतो, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीतच चाकू काढावा लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झालेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. एक्स-रे मध्ये निघालेल्या माहितीनुसार हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेला हा चाकू चायना चाकू असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत हा हल्ला कोणी केला जखमीचा आणि त्याचा काय संबंध होता त्यांच्यात काही वाद होते का याविषयी कसून पोलीस चौकशी करत आहे.