सिद्धार्थ जाधवच्या त्या पोस्टनं वाढवली चाहत्याची चिंता, म्हणाला, मी आठवडाभर… – siddharth jadhav share about his health actor was admitted in hinduja hospital
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींची तब्येत बिघडल्याचं समोर आलं आहे. या यादीत आता अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्या नावाचा समावेश झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून तो रुग्णालयात दाखल होता. आता त्याची प्रकृती बरी असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सिद्धार्थनं एक पोस्ट शेअर करत त्याच्या तब्येतीबद्दल अपडेट्स दिले आहेत. सिद्धार्थनं त्याचा रुग्णालयात असतानाचा एक फोटो शेअर केलाय. त्यानं त्याच्या हातात रुग्णालयाचा टॅग असलेला एक बॅन्ड आहे. सिद्धार्थनं त्याच्या पोस्टमध्ये हिंदूजा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसंच अमेय खोपकर, सतीश राजवाडे यांना टॅक करत सिद्धार्थनं त्यांनाही थॅंक्यू म्हटलं आहे. भावाने घेतली काळजी सिद्धार्थचा मोठा भाऊ देखील डॉक्टर आहे. त्यानंही सिद्धार्थची खूप काळजी घेतली. अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव, ‘तो मुलगा मला जंगलात ओढून घेऊन जात होता’ तब्येतीबद्दल सिद्धार्थ म्हणाला की, आता हळूहळू बरा होतोय. खूप धावपळ असते आपली, पण त्यातही स्वतःच्या आरोग्याकडं दुर्लक्ष होणार नाही याची प्लिज काळजी घ्या. सिद्धार्थनं त्याला नेमकं काय झालं होतं, हे जरी सांगितलं नसलं तरी चाहत्यांना त्याला काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.
सिद्धार्थ जाधव अर्थात आपला सिद्धू. प्रचंड एनर्जी असलेला हा गुणी अभिनेता. दिसायला अगदी सर्वसामान्य असलेल्या सिद्धार्थनं त्याच्या सहजसुंदर अभिनयानं मराठी तसंच हिंदी सिनेविश्वात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.