तरुणीने केली अश्लील कृत्ये
त्यांनी कॉल रिसिव्ह केल्यानंतर एक नग्न तरुणी समोर आली. तिने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. सुमारे दीड मिनिटे हा प्रकार सुरू होता. काही वेळाने एका तरुणीचा फोन आला, ती धमकीच्या स्वरात ५० हजार रुपयांची मागणी करू लागली. रक्कम न दिल्यास तिच्या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व नंबरवर अश्लील व्हिडिओ पाठवला जाईल, अशी धमकी तरुणीने दिली. ज्येष्ठ नागरिक घाबरले. यानंतर त्याला ना नीट जेवता येत होते, ना कोणाला आपली समस्या सांगता येत होती. त्यामुळे ते सतत चिंतेत होते.
१० ऑगस्ट रोजी हंस भवन, ITO येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी ते आले होते. यानंतर ओळखीच्या लोकांसह ते एका खासदाराला नॉर्थ अॅव्हेन्यूवर कारमधून भेटायला जात होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांना एक फोन आला. आपण सायबर क्राईमचे इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार बोलत असल्याचे पलिकडून सांगण्यात आले. एका मुलीने तुमच्यावर गुन्हा दाखल केला असून, तुम्ही कुठे भेटणार ते सांगा, असे तो बोलू लागला. ते घाबरले आणि ते त्याला आपली बाजू सांगू लागले. दुसऱ्या बाजूने कथित सायबर गुन्हे निरीक्षक धमक्या देऊ लागला.
त्यानंतर कॉल कट केल्यावर दुसरा कॉल आला. यावेळी आणखी एका व्यक्तीचा फोन आला. तुमच्याविरुद्धची तक्रार रद्द करून यूट्यूबवर पोस्ट केलेला व्हिडिओ डिलीट करू, पण त्यासाठी तु्म्हाला १७,२०० रुपये दंड भरावा लागेल, असे तो सांगू लागला. गाडीत बसलेल्या लोकांना ही बाब समजली नाही. सगळे खासदाराच्या घरी बसले होते, तेवढ्यात पुन्हा फोन आला. ज्येष्ठ नागरिक बाहेर आले आणि त्याने दुसऱ्या व्यक्तीकडून त्यांना सांगितलेल्या खात्यात रक्कम जमा करवून घेतली.
त्यानंतर ते पुन्हा आत आले. तेवढ्यात पुन्हा फोन आला. पलिकडून आवाज आला की तुमचा एक व्हिडिओ डिलीट करण्यात आलेला आहे, मात्र दुसरा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी आणखी २२ हजार रुपये अधिक भरावे लागतील. ज्येष्ठ नागरिक स्पष्टीकरण देऊ लागले तेव्हा शेजारी बसलेल्या मित्रांना लक्षात आले की काहीतरी गडबड आहे. त्यांनी त्यांच्याकडून फोन हिसकावून घेतला.
अशी केली सुटका
वृद्धाची अवस्था पाहून समोर बसलेल्या मित्रांना कळले की या ज्येष्ठ नागरिकाला ब्लॅकमेल केले जात आहे. त्यामुळे जेष्ठाच्या मित्राने फोनवरील व्यक्तीचा उद्धार केला. त्याला खडसावले. मात्र, तुम्ही कायदा हातात घेत आहात, असे भामटे पलिकडून बोलू लागले. याचे परिणाम वाईट होतील असेही ते म्हणत होते. ज्येष्ठ नागरिकाच्या मित्राने फोन करणार्याचा जोरदार समाचार घेतला, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाची या ब्लकमेलिंगपासून सुटका झाली. यानंतर सायबर हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली.