मागील चोवीस तासांत कोरची तालुक्यात १६१.३ मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल कुरखेडा तालुक्यात १२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून ५ लाख २ ९ हजार ७२५ क्यूसेक्स तर तेलंगणातील मेडिगड्डा धरणाच्या ८५ दरवाज्यांमधून ६ लाख ३६ हजार १३० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती नद्यांची पाणी पातळी धोका पातळीच्या वर पोहचली आहे.
दरम्यान गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी,असे आवाहन प्रशासनाने केले.
पुरामुळे खलील मुख्य मार्ग झाले बंद
गडचिरोली-आरमोरी, गडचिरोली -चामोर्शी, आलापल्ली-भामरागड, देसाईगंज-लाखांदूर, आष्टी-गोंडपिपरी, सिरोंचा-कालेश्वरम या प्रमुख मार्गांसह देसाईगंज-कोकडी-अरततोंडी, कोरची- भिमपूर – बोटेकसा, कोरची मसेली – बेतकाठी, कुरखेडा-वैरागड, वैरागड- पातलवाडा, लाहेरी- बिनामुंडा, अहेरी-लंकाचेन, अहेरी-वट्रा, अहेरी- देवलमरी इत्यादी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
कोरची तालुक्यात सर्वात जास्त पाऊस
अ.क्र. तालुक्याचे नांव पर्जन्यमान
१) गडचिरोली ५३.०
२) कुरखेडा १२२.१
३) आरमोरी ६९.७
४) चामोर्शी ६२.०
५) सिरोंचा २६.५
६) अहेरी ९२.५
७) एटापल्ली १०३.२
८) धानोरा ५५.६
९) कोरची १६१.३
१०) देसाईगंज ७५.१
११) मुलचेरा ८६.६
१२) भामरागड ८२.५
गडचिरोली जिल्हयाचं सरासरी पर्जन्यमान : ८२.५
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं छत्तीसगडला जाणारे १३५ प्रवासी अडकून पडले होते.