नाशिक : नाशिकच्या वडाळा गाव परिसरात पतीकडून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून करण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिझवान इसाक पठाण असं या घटनेतील आरोपी पतीचं नाव असून घरगुती वादातून पतीने पत्नीचा मोबाईलच्या चार्जर वायरने गळा आवळून खून केल्याची माहिती आहे. पत्नीची हत्या करून आरोपी पतीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हजर होऊन घटनेची माहिती दिली. हुमेरा रिझवान पठाण असं खून झालेल्या पत्नीचं नाव आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री; देशात तांदूळटंचाईचे संकट, दरवाढीची शक्यता
गेल्या अनेक दिवसांपासून दोघा पती पत्नीमध्ये वाद सुरू होते. याच वादाच्या कारणातून आरोपी रिझवान याने पत्नी हुमेरा हिचा खून केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, रिझवान हा व्यसनाधीन असल्याची माहिती समोर येत आहे. व्यसनावरून दोघा पती पत्नीमध्ये कायम वाद होत होते. दोन दिवसांपूर्वी देखील त्याने हुमेरा हिला मारहाण केली असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

ध्वजारोहण सोहळ्यात महिलेचा धक्कादायक प्रकार, स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतलं

संशयिताने खून केला नंतर पत्नी हुमेराचा मृतदेह घरात ठेऊन आरोपी पतीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन याबाबत माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला असून पोलिसांकडून या खुनाबाबत अधिक तपास सुरू आहे.

मुंबईत दुसरं शिवसेना भवन उभारण्याच्या तयारीत असलेल्या शिंदे गटाला शिवसेनेचा आक्रमक इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here