औरंगाबाद : प्रवाशी घेऊन जाणाऱ्या वाशीम – नालासोपारा बसला समोरून येणाऱ्या बसने हुलकवणी दिल्याने नियंत्रण सुटून एसटी बस शेतात जाऊन पलटली. या अपघातात बस मधील ४५ पैकी ७ जण गांभीर जखमी झाले तर ३८ जण किरकोळ जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. गंगापूर गावाजवळील किन्हाळा इथे ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवाने या अपघात कोणतीही जीविहानी झाली नाही. किरण प्रमोद देवकर वय-३९ (रा.देवगावरंगारी), महेंद्र उत्तम सातदिवे वय-६० (रा.नाशिक), प्रज्ञा दादासाहेब गायकवाड वय-३२, दिक्षा बाबासाहेब गायकवाड वय-१६ (रा.औरंगाबाद),सोपान कार्तिक मोहिते वय-८, सरला कार्तिक मोहिते वय-२२ (रा.जालना),रवींद्र रंगनाथ गायस्कार वय -४२ (रा.नाशिक) अशी सात जखमींची नावे आहेत.

Weather Alert : पुण्यात आज मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात या भागांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, वाशीमहून ४५ प्रवाशी घेऊन (एम.एच.०६ एस.९५६५) वाशीम – नलासोपारा ही एसटी बस नलासोपारा इथे जात होती. दरम्यान, गंगापूर जवळील किन्हाळा इथे समोरून आलेल्या दुसऱ्या बसणे हुलकवणी दिली. यामुळे चालक सिराजुद्दीन अहेमद शेख यांचा एसटीवरील ताबा सुटला आणि बस थेट रस्त्या शेजारील गट क्र-२२२ शेतात घुसली आणि पलटली.

मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी अपघातस्थळी धावा घेतली. दरम्यान, घटनेची माहिती पोलीसांना देत रुग्णवाहिकेला पाचारण केले. शेतकरी आणि पोलिसांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढाले. या अपघातात ३८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे तर सात प्रवासी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर औरंगाबद येथील रुग्णाल्यात उपचार सुरू आहे.

पती-पत्नीचा वाद भडकला, मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून; पोलिसांत धक्कादायक कारण उघड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here