नवी दिल्ली : गुन्ह्यांच्या घटना वाढत असताना देशाला हादरवून सोडणारी घटना दिल्लीत समोर आली आहे. दुहेरी हत्याकांडाने दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. शाहदरा परिसरात सासू आणि सुनेची निर्घृण हत्या करण्यात आली. इतकंच नाहीतर घरातील दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे. तर सध्या पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील शाहदरा भागात सासूची हत्या करण्यात आली आहे. घरात घुसून चोरट्यांनी ही घटना घडवली. मिळालेल्या माहितीनुसार, डॉली रॉय आणि तिची सासू विमला देवी घरात एकट्या होत्या. डॉलीची दोन्ही मुले दिल्लीबाहेर गेली होती. मंगळवारी पहाटे मुले घरी परतली असता, वारंवार फोन करूनही कोणीही दरवाजा उघडला नाही.

Weather Alert : पुण्यात आज मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात या भागांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट
यानंतर मुलांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला तेव्हा घरात आई आणि आजीचे रक्ताने माखलेले मृतदेह पडले आढळले. यानंतर घरात तपास केला असता घरातून दागिने आणि रोख रक्कमही गायब होती. तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, चोरटे हे ओळखीचे असावेत असा पोलिसांचा संशय आहे.

प्रवाशी घेऊन जाणारी एसटी बस पलटली; ७ जण गंभीर जखमी
घरात घुसल्यानंतर आरोपींनी सासू आणि सुनेची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. सध्या पोलीस सीसीटीव्ही तपास करत आहेत जेणेकरून मारेकऱ्यांपर्यंत पोहोचता येईल. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या जालन्यातल्या ‘त्या’ कंपनीत बनतं तरी काय? झाला उलघडा, वाचा Inside Story

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here