सोलापूर : पोस्को गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या मंगळवेढा कारागृहातील संशयित आरोपीने काल रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सुनील तानाजी किसवे (वय २१) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.

वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत राहणारे मंगळवेढ्याचे सब जेल पुन्हा एकदा आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलं आहे. शिरानंदगी येथे राहणाऱ्या सुनील किसवे या २१ वर्षीय तरुणावर दीड महिन्यांपूर्वी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तो सध्या मंगळवेढा येथील सब जेलमध्ये होता. रात्री जेवणानंतर आरोपींची हजेरी घेत असताना एक आरोपी कमी लागल्याने चौकशी केला असता त्याने चार कोठडीच्या बाजूला ट्रेझरीच्या बोळात मफलरच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले.

रेल्वेमध्ये महिला विसरली एक लाखांचे दागिने…; पुढे जे घडले ते वाचून तुम्हीही थक्क व्हाल

या घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर अधिकारी व नातेवाईक घटनास्थळी हजर झाले आणि मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आज सकाळी ६.४५ च्या दरम्यान दाखल करण्यात आले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी भेट दिली.

दरम्यान, याबाबतची फिर्याद सिताराम रायप्पा कोळी (वय५४, रा. अकोले) यांनी दिली असून गळफास कारागृहात घेतला असल्यामुळे यातील प्रमुख अधिकारी आल्याशिवाय शवविच्छेदन केले जाणार नसल्याचा पवित्र घेतला असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here