कोल्हापूर : राज्यात सध्याची तरूणाई सहज टपऱ्या आणि क्लबमध्ये पाहायला मिळते. पण कोल्हापुरातून एक अशी घटना समोर आली ज्यामध्ये तरुण मुलींनी असं काही केलं की घटना आणि संबंधित व्हिडिओ पाहून तुम्ही हादराल. कोल्हापुरातील पंचगंगा तालीम मंडळ इथे नशा करत छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या पोस्टर समोर धिंगाणा घालत असतानाचे मुलींचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामुळे शिव प्रेमींकडून आता प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

डबल मर्डर! मुलं घरी नसताना सासू-सुनेची निर्घृण हत्या, घराची झडती घेताच पोलीस हादरले
डॉल्बीच्या तालावर सिगरेटच्या धुरकांड्या ओढत नशापाणी करत मुली नाचत असतानाचं व्हिडिओमधून दिसून येत आहे. याप्रकरणी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मुलीं विरोधात तक्रार दाखल करणार आहेत. तर यामुळे संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये…

कोल्हापुरातील शुक्रवार पेठ परिसरातील पंचगंगा तालीम मंडळ यांच्या मिरवणुकीतील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही मुली नशा करत धिंगाणा घालत असल्याचे दिसून येत आहे. संतापजनक म्हणजे हा सर्वप्रकार छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या फोटो समोर होत आहे. यामुळे या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. हा व्हायरल व्हिडिओ कधीचा आहे, हे अद्याप करू शकले नाही.

Weather Alert : पुण्यात आज मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात या भागांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट
व्हायरल व्हिडिओमध्ये डीजेच्या तालावर काही तरुणी चंद्रमुखी या गाण्याच्या रिमिक्सवर सिगारेट ओढत नाचत असल्याचे दिसून येत आहे. तर यामध्ये काही तृतीयपंथी देखील असल्याचे दिसत आहे. शिवाय डीजेच्या बाजूला पंचगंगा तालीम मंडळ शुक्रवार पेठ असे लिहिले असून या दोन्ही बाजूला छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचे फोटो लावण्यात आले आहेत. नशा करत डीजेच्या तालावर धांगडधिंगा घालत, सिगरेट ओढणे आणि गोंधळ घालण्याच्या या प्रकारामुळे शिवप्रेमी आणि शाहूप्रेमींनी संताप व्यक्त केला असून यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शिवशाहू प्रेमींकडून होत आहे.

प्रवाशी घेऊन जाणारी एसटी बस पलटली; ७ जण गंभीर जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here