मुंबई- साखरपुडा झाला, एकमेकांचे वाढदिवस रोमँटिकपणे साजरे करून झाले, कोकण भटकंती झाली. थेट लंडनमध्ये सुट्टीचा आनंद साजरा करून झाला. आता लग्न कधी करणार असे प्रश्न चाहत्यांकडून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांना विचारले जात होते. याच प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर हार्दिक जोशीची इन्स्टा स्टोरी नक्की पाहा. दापोलीला एका मैत्रिणीकडे ही जोडी गेली असून तिथे अक्षया आणि हार्दिकसाठी मस्त केळवणाची पंगत मांडली गेली. आता लग्नमुहूर्त जवळ आल्याचीच ही पावती मिळाल्याने राणादा आणि पाठकबाई यांचे चाहते खुश झालेत.

सैफच्या मुलांना संपत्तीवर सोडावे लागणार पाणी; एवढा पैसा कुठे जाणार?

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय ठरलेली राणादा आणि पाठकबाई ही ऑनस्क्रिन जोडी म्हणजे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. तीन महिन्यांपूर्वी दोघांनी साखरपुडा करून ही गोड बातमी चाहत्यांना दिल्यापासूनच लग्न कधी करणार ही उत्सुकता त्यांच्या फॅनक्लबमध्ये होती. पण आता ही प्रतीक्षा हार्दिक आणि अक्षयाबरोबरच चाहत्यांसाठीही संपली असून त्यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरल्याचे संकेत हार्दिकने इन्स्टास्टोरीवरील फोटोंमधून दिले आहेत. हार्दिक आणि अक्षया सध्या केळवणं जेवत असल्याने त्यांचं शुभमंगल आता काही फार लांब राहिलेलं नाही.


हार्दिकने नुकताच त्याच्या स्टोरीवर केळवणाचे फोटो शेअर केला आहे. अक्षय आणि हार्दिक या दोघांना त्यांच्या एका मैत्रिणीने केळवण केल्याचं या फोटोत दिसत आहे. त्यासाठी ही जोडी दापोलीला कोठारे नावाच्या मैत्रिणीकडे गेली आहे. गोडाधोडाचे पदार्थ या केळवणासाठी हार्दिक आणि अक्षयाच्या ताटात वाढले आहेत. अक्षया आणि हार्दिक यांचं लग्नासाठीचं हे पहिलंच केळवण असल्याने दोघांनीही हा क्षण खूप एन्जॉय केला.

‘तो मला जंगलात ओढून नेत होता’ अभिनेत्रीने सांगितला स्वानुभव

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत अक्षया आणि हार्दिक यांनी एकत्र काम केलं. हार्दिकची राणादा तर अक्षयाची अंजली पाठक बाई ही भूमिका खूप गाजली. मालिका संपल्यानंतर दोघंही नव्या प्रोजेक्टमध्ये बिझी होते. अचानक यंदाच्या अक्षय तृतीयेदिवशी दोघांनी साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. ऑनस्क्रिन तर ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीची होतीच आता प्रत्यक्ष आयुष्यातही ही जोडी एकत्र येणार हे ऐकल्यावर चाहत्यांनी दोघांवरही शुभेच्छांचा पाऊस पाडला.

हार्दिक जोशी

अक्षया आणि हार्दिक आता लग्न कधी करणार असं त्यांना चाहते सोशलमीडियावर विचारत होते. साखरपुडा झाल्यानंतर दोघांनी एकत्र कोकण आणि थेट लंडनलाही सफर केली. लंडनमधील त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले. दोन महिन्यांपूर्वी दोघांनी लग्नासाठीचं डेस्टिनेशनही ठरवलं. पुण्यातील एका वाड्यात लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तर लग्नाची खरेदी कोल्हापुरात करण्याचंही त्याचं ठरलं आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या शूटिंगसाठी चार वर्षे अक्षया आणि हार्दिक कोल्हापुरात होते. त्यामुळे कोल्हापुरातच लग्नाची खरेदी करायची असं त्यांनी ठरवलं आहे. लग्नाच्या काही गोष्टी दोघांनीही आधीच ठरवल्या आहेत. आता फक्त या दोघांच्या डोक्यावर कधी एकदा अक्षता पडतात अशी घाई चाहत्यांना झाली आहे.


हार्दिकने नुकतीच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका केली. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने निरोप घेतला. हे तर काहीच नाय या शोची निवेदिका म्हणून अक्षयाने नवी इनिंग सुरू केली. हार्दिक आणि अक्षया यांना पुन्हा स्क्रिनवर एकत्र पाहण्याची इच्छाही लवकरच पूर्ण होणार आहे. फाइल नंबर ४९८ या सिनेमात हार्दिक आणि अक्षया एकत्र दिसणार आहेत.

अंकुश आणि दीपाची ऑफस्क्रीन केमिस्टी ऑनस्क्रीन दिसणार? अंकुश म्हणाला….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here