मुंबई : शिवसंग्रामचे पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं नुकतंच अपघाती निधन झालं. मेटे यांच्या निधनानंतर या अपघाताबाबत अजूनही काही प्रश्न अनुत्तरित असल्याने घातपाताचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. अशातच विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी माध्यमांसोबत बोलताना कारचालक एकनाथ कदम याच्याविषयी केलेल्या दाव्यामुळे संशयाचं धुकं आणखीनच गडद झालं आहे.

‘अपघात झाल्यानंतर माझं कारचालक एकनाथ कदम याला सातत्याने एकच म्हणणं होतं की, साहेबांशी बोलणं करून दे. साहेबांच्या दोन्ही नंबरवर मी फोन केले, पण ते फोन उचलत नव्हते. माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही तर मला वाटत होतं किमान सुरक्षारक्षकाशी तरी बोलणं व्हावं, कारण तोपर्यंत मला माहीत नव्हतं की सुरक्षारक्षकही जखमी आहे. मात्र एकनाथ हा कोणाशीच बोलणं करून देत नव्हता. तो एकमेव व्यक्ती होता ज्याला हे सगळं कसं झालं हे माहीत आहे. मग साहेबांचा मृत्यू झाला आहे हे त्याला माहीत होतं का? किंवा नसेल झाला तर त्याने वैद्यकीय मदत मागितली का? असे सगळे मुद्दे अनुत्तरित आहेत,’ असं ज्योती मेटे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

मोठी बातमी: जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, आयटीबीपीचे ६ जवान शहीद

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं म्हटलं आहे. त्यामुळे ही चौकशी पारदर्शकपणे व्हावी, अशी आमची मागणी असणार आहे, असंही ज्योती मेटे यांनी म्हटलं आहे.

दुर्मिळ! ९ वर्षाच्या अवनीचे हृदय वयोवृद्ध व्यक्तीसारखे, हार्ट ॲटक आल्यानंतरही डॉक्टर ठरले देवदूत

अपघात नेमका कसा झाला?

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ भातण बोगद्याच्या साधारण १५० मीटर अगोदर विनायक मेटे यांची मोटार त्यांच्या गाडीच्या पुढे असलेल्या ट्रकसदृश अवजड वाहनावर जोरदार धडकली. हा आघात इतका मोठा होता की, चक्काचूर झालेल्या मोटारीच्या डाव्या भागातून त्यांच्या अंगरक्षकास दरवाजा कापूनच बाहेर काढावे लागले. मोटारचालक एकनाथ कदम यांच्या शेजारी मेटे यांचे अंगरक्षक बसले होते. तर मागच्या आसनावर मेटे बसले होते. अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

दरम्यान, विनायक मेटे यांच्या गाडीला धडक देऊन पळ काढणाऱ्या ट्रक चालकाचा शोध घेऊन चालकाला ट्रकसह पालघर जिल्ह्यातील कासा पोलिसांनी दमण येथून ताब्यात घेतलं आहे. सध्या याप्रकरणी ट्रकचालक आणि मेटे यांचा कारचालक एकनाथ कदम याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here