Vinayak Mete mumbai pune expressway accident | विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूनंतर तपासात नवनव्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत. मुळात अपघात कुठे आणि केव्हा झाला, हे कोणीच आम्हाला सांगत नव्हते. मी गाडीच्या ड्रायव्हरशी बोलले, पण तोदेखील अपघात कुठे झाला हे सांगू शकला नाही, असे विनायक मेटेंची पत्नी ज्योती मेटे यांनी सांगितले.
हायलाइट्स:
- एकनाथ कदम याच्याकडून पोलिसांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत
- मेटे यांच्या गाडीचा चालक सतत आपला जबाब बदलत आहे
- या चौकशीतून कोणती माहिती पोलिसांच्या हाती लागली
या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पोलिसांकडून आता विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक आणि मेटे यांच्या अंगरक्षकाच्या फोन कॉलचा डेटा तपासला जाणार आहे. या दोघांनाही विनायक मेटे यांच्या अपघातापूर्वी कोणाचे फोन आले होते, हे पोलिसांकडून पाहिले जाईल. तसेच मेटे यांच्या गाडीला धडक देणाऱ्या आयशर ट्रकच्या चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांकडून आयशर ट्रकचा चालक आणि मेटेंच्या चालकाला समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार होती. या चौकशीतून कोणती माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच पोलिसांकडून विनायक मेटे यांच्या अपघातावेळी Mumbai Pune Express Way मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे सीसीटीव्ही फुटेजही पाहिले जाईल. यामध्ये एखाद्या गाडीची हालचाल संशयास्पद दिसते का, हे पाहिले जाईल.
पुण्यात ३ ऑगस्टला मेटेंच्या गाडीचा पाठलाग झाला होता, कार्यकर्त्याचा दावा
शिवसंग्राम संघटनेच्या एका कार्यकर्त्याने खळबळजनक दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे परिसरात विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा पाठलाग झाला होता. तेव्हादेखील एक आयशर ट्रक मेटे यांच्या गाडीला कट मारत होता, असे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याने सांगितले. त्यावेळी विनायक मेटे बीडहून पुण्याला परतत होते. मेटे यांची गाडी पुण्यापासून साधारण २० किलोमीटर अंतरावर असताना एक आयशर ट्रक आणि कारने त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यावेळी चॉकलेटी रंगाच्या आयशर ट्रकने विनायक मेटे यांच्या गाडीला दोन-चारदा कट मारली. कारमध्ये बसलेले दोन-चारजण ट्रक मागे घे, पुढे घे, असे सांगत असल्याचे संबंधित कार्यकर्त्याने सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.