Mumbai Crime News : अंबरनाथमध्ये एका तरुणाला भररस्त्यात मारहाण झाल्याची घटना घडली आहे. चिंचपाडा परिसरातील ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Mumbai Crime News

हायलाइट्स:

  • अंबरनाथमध्ये भररस्त्यात तरूणाला मारहाण
  • कौटुंबिक वादातून प्रकार घडल्याची पोलिसांची माहिती
  • पोलिसांकडून परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल
मुंबई : अंबरनाथमध्ये एका तरुणाला भररस्त्यात मारहाण झाल्याची घटना घडली आहे. चिंचपाडा परिसरातील ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अंबरनाथच्या चिंचपाडा परिसरात सलमान शेख हा तरुण १२ ऑगस्ट रोजी रस्त्याने जात होता. यावेळी त्याला निषाद सय्यद आणि सिद्दीक चौधरी या दोघांनी रस्त्यावर पाडून मारहाण केली. हा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाला. मारहाण करणारा निषाद सय्यद याची आई झुलेखा सय्यद या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्यानं या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला.

Bhandara Weather Today : महाराष्ट्रात पावसाचे रौद्ररुप, वैनगंगामुळे ४८ गावांचा संपर्क तुटला, तब्बल ८२ मार्ग बंद
हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल केले. मात्र, या प्रकरणात राजकारणाचा काहीही संबंध नसून हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. झुलेखा सय्यद आणि बांधकाम व्यावसायिक नझीर शेख यांचे कौटुंबिक वाद असून सलमान या नझीर शेख यांच्याकडे काम करतो. त्याच वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितलं आहे.

मोठी बातमी: जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, आयटीबीपीचे ६ जवान शहीद

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here