pune news today, पुण्यातील तरुणाला लागलं अजब वेड; नव्या पांढऱ्या रंगाच्या गाड्या चोरायचा आणि… – a 20-year-old accused who stole seven white two-wheelers in pune was arrested
पुणे : अलीकडच्या काळात कोणाला कोणता छंद लागेल, हे सांगता येत नाही. पुण्यात एका तरुणाला चक्क पांढऱ्या रंगाच्या गाड्या चोरी करण्याचा छंद लागला होता. आरोपीने आतापर्यंत ७ पांढऱ्या रंगाच्या गाड्या चोरी केल्या आहेत. विवेक वाल्मीक गायकवाड (वय २०, रा. थेरगांव) असं सदर आरोपीचं नाव असून त्याला चतु:श्रृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, विवेक हा मूळचा उस्मानाबाद जिल्हातील रहिवासी आहे. तो काही दिवसांपूर्वी पुण्यात आला होता. विवेक कोणतंही काम करत नव्हता. त्याला नवीन गाड्या फिरवण्याचा शॉक होता. त्याही नवीन पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाड्या. म्हणून तो पार्किंगमधून नवीन गाड्या चोरायचा. मात्र या गाड्या तो विकत नसत तर फक्त फिरवायचा आणि त्या गाडीमधील पेट्रोल संपल्यानंतर गाडी त्याच ठिकाणी सोडून पसार होत असत. त्याने चतु:श्रृंगी, वाकड, सांगवी या भागातून या दुचाकी चोरी केल्या होत्या. मी त्याला सतत सांगत होते, माझं साहेबांशी बोलणं करून दे, पण…; ज्योती मेटेंच्या दाव्याने संशयाचं धुकं गडद
शहरात वाहन चोरट्याने धुमाकूळ घातल्याचं समोर आल्यानंतर परिमंडळ चार विभागचे उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस अंमलदार प्रकाश आव्हाड, तेजस चोपडे, बाबा दांगडे व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी चोराची पुढची क्लुप्ती शोधत विविध भागात थेट पार्किंगमध्ये ट्रॅप लावला. एका सोसायटीत पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मुळे व किशोर दुशिंग हे दुसऱ्या पार्किंगमध्ये थांबलेले असतानाच विवेक हा नव्या गाड्यांना चाव्या लावून पाहत असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याच्या मुसक्या आवळत त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यामध्ये विवेक याने आतापर्यंत ७ गाड्या चोरल्याचं निष्पन्न झालं आहे.