चिठ्ठीमध्ये राजुरा बस डेपोमधील सहाय्यक वाहतूक निरीक्षक टाले या महिला कर्मचारी आणि चालक व्ही. एल. कोवे यांचा उल्लेख केला आहे. हे दोघे सतत पैशाची मागणी करत होते. टाले ही महिला अधिकारी महिन्याला १० हजार रुपये मागत असल्याचे सुसाईड नोटमध्ये यादव यांनी लिहिलं आहे. बल्लारपूर पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत. एसटी महामंडळातील अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करत बरखास्त करण्याची मागणी केली जात आहे.
राजुरा डेपोतील एटीआय टाले ही महिला कर्मचारी आणि चालक व्ही. एल. कोवे हे दोघे पैसे मागत असल्याने आणि प्रचंड मानसिक त्रासाला कंटाळून भगवान यादव यांनी काल १५ ऑगस्टला घरी आत्महत्या केली. घरातील एकमेव कमावता पुरुष गेल्याने आई, भाऊ, पत्नी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एसटी महामंडळातील अशा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना तात्काळ बरखास्त करण्याची मागणी केली जात आहे. तसेच घरातील एकाला महामंडळात नोकरी देण्याची मागणी केली जात आहे.
महिला कर्मचारीच्या अनेक वेळा तक्रारी
महिला कर्मचारी पैसे मागत असल्याच्या अनेक वेळा तक्रारी आहेत. मात्र, कुणीही याबाबत तक्रार करण्यासाठी पुढे आले नाही. कुणाची भिती नसल्याने हाताखालील कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास ही महिला कर्मचारी द्यायची आणि अखेर महिला कर्मचाऱ्यामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष का केले? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे.
मध्यरात्री घेतला गळफास
दररोजच्या मानसिक त्रासाला कंटाळून जीवन संपविण्याचा निर्णय भगवान यादव यांनी घेतला. पत्नी रक्षाबंधनासाठी माहेरी गेली असता रात्री ११ वाजता मित्रासोबत बोलले आणि आईने जेवण दिले पण मी रात्री उशिरा जेवण करतो, तू झोप, असे ते म्हणाले आणि सर्व झोपी गेल्यावर रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेतला.
सकाळी आईने दार ठोठावले पण
स्वातंत्र्यदिन असल्याने आईने नातीला शाळेत सोडले. भगवान अजून उठला नाही म्हणून आईने आवाज दिला. प्रतिसाद न मिळाल्याने दार लोटले असता आईला दिसलेले दृश्य भयंकर होते. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील चौकसी पोलीस करत आहेत.