in ratnagiri st bus stuck in tree: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात लांज्याहून वाडगावला जाणाऱ्या एसटी बसचा बेनी धरणाजवळ अपघात झाला. सुदैवाने बस एका झाडाला अडकल्याने धरणाच्या पाण्यात कोसळली नाही. एसटीमधील मुले व प्रवासी दैव बलवत्तर म्हणून बचावले.

 

st bus accident
रत्नागिरीत एसटी बसला अपघात
रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात लांज्याहून वाडगावला जाणाऱ्या एसटी बसचा बेनी धरणाजवळ अपघात झाला. सुदैवाने बस एका झाडाला अडकल्याने धरणाच्या पाण्यात कोसळली नाही. एसटीमधील मुले व प्रवासी दैव बलवत्तर म्हणून बचावले. याचवेळी या बसची धडक एका रिक्षाला बसल्याने रिक्षाचालक जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारनंतर घडल्याची माहिती समोर आली आहे.

लांजा बस स्थानकातून दुपारी १ वाजता ही बस विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना घेऊन निघाली. स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन आटोपून जवळजवळ २५ ते ३० विद्यार्थी बसने (एमएच १४ बीटी ३००५) निघाले. बसमध्ये काही अन्य प्रवासीही होते. दुपारी १.३० वाजण्याच्यादरम्यान बेनी येथे बसची रिक्षाला (एमएच ०८ के २५६५ ) धडक बसली. त्यामुळे एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस साईटपट्टी सोडून शेजारी असलेल्या झाडाला अडकून थांबली. बस झाडाला अडकून थांबली नसती तर थेट धरणाच्या पाण्यात गेली असती व मोठा अनर्थ ओढवण्याचा धोका होता. बस थांबल्यानंतर सर्व विद्यार्थी व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here