मुंबई: आपल्या चित्रपटात महिला पात्रांना जरा जास्तच भाव देतो म्हणून ज्याच्याबद्दल चर्चा केली जाते, तो दिग्दर्शक अनुराग कश्यप वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर एका अभिनेत्रीने अत्याचाराचे आरोप केले होते. तर आता पुन्हा एकदा तो त्याच्या वक्तव्यामुळं चर्चेत आला आहे. एका अभिनेत्रीच्या स्तनावर कमेंट केल्यामुळं अनुकागला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

अनुरागनं दिग्दर्शित केला दोबारा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघंही अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. या दोघांनी नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बेडरुम दाखवण्याच्या बहाण्याने बलात्कार; प्रसिद्ध गायकावर कॉस्च्यूम डिझायनरचा गंभीर आरोप
अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंबद्दल अनुराग आणि तापसीला सिद्धार्थ कनन प्रश्न विचारताना दिसतोय. तसंच आता तुम्ही देखील न्यूड फोटोशूट करायला हवं, असंही तो सांगतो. यावर तापसी लगेचच ‘आता लगेचच हॉरर शो सुरू करू नका, असं म्हणताना दिसते. यावर सिद्धार्थ कनन तापसीना म्हणतो की, तू अनुरागवर जळतेय, कारण तुला हे चांगलंच माहित आहे की, त्यांनी जर न्यूड फोटोशूट केलं तर ते प्रचंड व्हायरल होणार आहे.
मुलीच्या जन्मानंतर अवघ्या ४ महिन्यांनी पुन्हा प्रेग्नंट अभिनेत्री; सोनोग्राफी रिपोर्ट शेअर करत म्हणाली…
हे सर्व सुरू असताना अनुराग म्हणतो, की तापसी खरंच मला घाबरते, कारण माझे स्तन तिच्यापेक्षा मोठे आहेत. अनुरागनं दिलेलं उत्तर ऐकून तापसी आणि सिद्धार्थ कनन दोघंही हसू लागतात.

पाहा व्हिडिओ:


तापसी ट्रोल
अनुरागनं तापसीच्या स्तनांवर केलेल्या कमेंटमुळं त्याच्यावर टीका होत आहे. त्याला ट्रोल करण्यात येत आहे. हे सर्व तापसीनं हसण्यावारी घेतलं असल्यानं तिलाही ट्रोल करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here