पूजा प्रसाद असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. ती मूळची बिहारची असून गेल्या २५ वर्षांपासून ते भोसरी परिसरात स्थायिक झाले आहेत. त्या महिलेचा पती एका खासगी कंपनीत कामाला असून ते उदरनिर्वाहासाठी कपड्याचे दुकान चालवतात. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी मधील लांडगे आळी परिसरात पूजा आणि प्रसाद स्वतःचे प्रगती कलेक्शन नावाने गेल्या २ वर्षांपासून दुकान चालवत होते. आज सकाळी एक अनोळखी व्यक्ती दुकानात शिरली आणि त्याने महिलेवर चाकूने धार धार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात महिलेने स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करत दुकानाच्या बाहेर पळत आली. मात्र, तिच्या मानेवर आणि गळ्यावर वार झाल्याने ती रस्त्यावर कोसळली. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुकानाबाहेर पडलेल्या महिलेला दवाखान्यात हलवण्यात आले मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस पथक त्याचा तपास करत आहे. हत्या करण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आले नसले तरी वैयक्तिक कारणावरूनच हत्या झाली असावी असा अंदाज पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.
Vinayak Mete : विनायक मेटेंचा घात की अपघात, ७२ तासांच्या तपासात पत्नीने शोधले धागेदोरे