ब्रसेल्स: वाहन चालवत असताना एखादी साधी चूकदेखील जीवघेणी ठरू शकते. वाहन चालवताना लागलेली एखादी डुलकी अपघातास कारण ठरू शळते. बेल्जियममध्ये मात्र एक वेगळीच घटना घडली आहे. कार चालवत असताना एक व्यक्ती बेशुद्ध पडली. मात्र तरीही कार २५ किलोमीटर धावत होती. कारच्या बाजूनं जात असलेल्या वाहनांमधील हा प्रकार पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कार रोखण्यात आली.

१४ ऑगस्टला बेल्जियमच्या लेऊवेनमधील रस्त्यावरून नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरू होती. त्यावेळी एका कारमधील चालक झोपला असल्याचं बाजूनं जात असलेल्या वाहनांमधील प्रवाशांनी पाहिलं. चालक झोपलेला असतानाही कार अतिशय व्यवस्थित चालत असल्याचं पाहून प्रवासी चकीत झाले. काही अनर्थ घडू नये त्यांनी हा प्रकार पोलिसांना आणि आपत्कालीन यंत्रणांना कळवला. त्यांनी कारचं लोकेशनहीदेखील यंत्रणांना सांगितलं.
सापानं दंश केला, २ वर्षांची मुलगी चिडली; दातानं चावून थेट दोन तुकडे केले अन् मग…
पोलिसांनी तातडीनं चक्रं फिरवली आणि कार (रेनॉ क्लिओ) थांबवली. या कारच्या चालकाला भोवळ आली होती. त्यामुळे तो बेशुद्ध पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवानं त्याला कोणतीही इजा झालेली नाही. चालक बेशुद्ध पडल्यानंतरही कार तब्बल २५ किलोमीटर धावत होती.

कारचा चालक शुद्धीत नसतानाही कार अतिशय व्यवस्थितपणे धावत आहे. उजवी, डावी वळणं घेत आहे, अशी माहिती पोलिसांना काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. कारमध्ये असलेल्या क्रूझ कंट्रोलमुळे अपघात झाला नाही. कारमध्ये लेन असिस्ट होतं. त्यामुळे कार वळल्यानंतरही ती लेनच्या बरोबर मध्यभागी होती. क्रूझ कंट्रोलनं कारचा वेग कायम राखला होता. लेन असिस्ट आणि क्रूझ कंट्रोलमुळे कार २५ किलोमीटर पळत राहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here