डोंबिवली : डोंबिवलीत पुन्हा एकदा अपहरणाची घटना घडली आहे. डोंबिवली पूर्वेतील आयरे परिसरात हा प्रकार घडला असून वाढदिवसाची मेजवानी जल्लोषात साजरी करण्यासाठी तीन मित्रांनी एका भंगार विक्रेत्या मित्राचे अपहरण केले. या तिघांनी भंगार विक्रेत्या मित्राला खोटे सांगून त्याला घरातून बाहेर बोलवले आणि तीन जणांनी एका रिक्षेत जबरदस्तीने बसवून त्याला नवी मुंबईतील खारघर येथे नेले. तेथे त्याच्या जवळील मोबाईल, रोख पाच हजार रुपये काढून घेऊन त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अपहृताच्या कुटुंबीयांकडे मुलाला जिवंत पाहिजे असेल तर २० हजार रुपयांची खंडणीची मागणी केली. तर, पैसे दिले नाहीत तर आरोपींनी आकाशला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार आकाशच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे सुरू केली. दरम्यानच्या काळात आरोपींनी आकाशला डोंबिवलीत आणून सोडून पलायन केले आहे. दरम्यान, रात्रभर आकाश आरोपींच्या ताब्यात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. (the trio kidnaps a scrap dealer for money to celebrate birthday with joy)

रामनगर पोलीस ठाण्यात भंगार विक्रेता मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला आहे. शनिवारी रात्री आठ ते रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव स्मशानभूमी रस्ता शिवा स्कॅप मार्ट ते नवी मुंबईतील खारघरदरम्यान घडला आहे. आकाश उर्फ शिवा ननकू राम (२४) असे भंगार विक्रेत्याचे नाव असून जगू दिवाणे, संकेत गायकवाड, वांग्या पवार अशी आरोपी तरुणांची नावे आहेत.

हिंदू समाज अहिंसक होता, पण आता…; अभिनेते शरद पोंक्षे यांनी हिंदू समाजाबाबत केले मोठे विधान
फियार्दी आकाश राम आणि तिन्ही आरोपी एकाच भागात राहत असल्याने एकमेकांना परिचित आहेत. आकाश भंगार विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामुळे त्याच्याजवळ भरपूर पैसे आहेत असा आरोपींचा समज होता. आकाशचा वाढदिवस असल्याने आपण त्याच्याकडून मेजवानीच्या ना‌वाखाली पैसे उकळू असा कट आरोपी वांग्या, जगू आणि संकेत यांनी आखला. आरोपींनी आकाशला शनिवारी रात्री आठ वाजता घराबाहेर मोबाइल करुन बोलावून घेतले. मित्र बोलवितात म्हणून तो घराबाहेर आला. आरोपींनी आकाशला आपण तुझ्या वाढदिवसाची मेजवानी साजरी करू असे सांगू लागले. आकाशने त्यास नकार देऊ लागला. हे बोलणे सुरू असतानाच तिन्ही आरोपींनी आकाशला जबरदस्तीने एका रिकाषेत बसविले. आकाशने त्यास प्रतिकार केला, पण आरोपींनी त्याला घट्ट पकडून ठेवले होते. रिक्षात बसल्यावर आकाशकडील मोबाइल, पाकिटातील पाच हजार रुपये आरोपींनी काढून घेतले.

सुराज्याची पहिली पहाट कधी होईल?, डोंबिवलीतील शाळेच्या बसवरील फलक चर्चेत
आकाश आरोपींच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी वांग्याने आकाशला बंदुकीचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली. आपले अपहरण केले जात आहे याची जाणीव झाल्यावर आकाश घाबरला. त्याची आरोपीच्या तावडीतून सुटण्याची धडपड सुरू होती. आरोपी त्याला सोडत नव्हते. आरोपींनी रिक्षा सुसाट वेगाने नवी मुंबईतील खारघर भागात नेली. या भागात आकाशला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी, पट्टयाने बेदम मारहाण करण्यात आली. एकटाच असल्याने तो काही करू शकत नव्हता.

क्रूरपणाचा कळस! प्रेयसी गर्भवती झाल्याचे कळले, त्याने तिला निर्जन स्थळी बोलावले आणि केले अमानुष कृत्य
व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण ..

मौजमजा, झटपट श्रीमंत होण्यासाठी डोंबिवलीतील बेरोजगार तरुण एकत्र येऊन व्यावसायिकांचे अपहरण करत असल्याचे चित्र आहे. यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात डोंबिवलीतील एका फर्निचर विक्रेत्याचे ५० लाखाच्या खंडणीसाठी चार जणांनी अपहरण केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here