सिंधुदुर्ग: जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढतच असून आज सकाळपर्यंत ५६ रुग्ण संख्या असलेल्या या जिल्ह्यात आज दुपारपर्यंत ६९ एवढी रुग्णसंख्या झाली आहे. आज आढळलेल्या १३ रुग्णांमध्ये एका १७ महिन्याच्या बाळाचाही या रुग्णांमध्ये समावेश असून जिल्हा रुग्णालयातील एका नर्सलाही करोनाची बाधा झाली आहे. २ मे पासून आजपर्यंत जिल्ह्यात राज्याच्या अन्यभागातून ५८ हजार ८२५ लोक आले आहेत. यामध्ये मुंबईकरांचा सर्वाधिक समावेश आहे.

आज आलेल्या १३३ अहवालांपैकी १३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या जिल्ह्यात २७ हजार ८३१ लोक संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले असून २६ हजार १७५ व्यक्ती गावपातळीवर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यात लवकरच करोना टेस्ट लॅब सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलंय. जिल्ह्यात ही लॅब व्हावी म्हणून शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि दीपक केसरकर यांनी पाठपुरावा केल्याचंही सामंत यांनी सांगितलं. तर वैभव नाईक यांनी करोनाच्या संकटाचं कुणीही राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील नर्सला करोना झाला त्याला जिल्हा शल्यचिकित्सक जबाबदार असून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here