देशातील प्रसिद्ध आणि सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांना सरकारकडून Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सुमारे ५५ कमांडो प्रत्येक क्षणी सज्ज असतात. हे सुरक्षा गार्ड्स जर्मन बनावटीच्या हेकलर अँड कोच MP5 सब-मशीन गनसह अनेक आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असतात. ही मशीनगन एका मिनिटात ८०० राउंड फायर करू शकते. त्यांच्या तीन मुलांना महाराष्ट्र सरकारने दर्जेदार सुरक्षा दिली आहे. एका अहवालानुसार, Z+ सुरक्षेवर दरमहिना सुमारे २० लाख रुपये येतो. अंबानींच्या सुरक्षेमध्ये सामील असलेला प्रत्येक सैनिक मार्शल आर्ट, नि:शस्त्र लढाऊ कौशल्यांमध्ये निपुण आहे. CRPF कमांडो दलात सशस्त्र रक्षक, सोबत असलेले रक्षक, चालक, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, शोध पथक यांचा समावेश आहे.

मुकेश अंबानींना धमकीचा कॉल

देशातील सर्वात मोठे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा धमक्या आल्या आहेत. एकाच दिवसात तीन फोन कॉल्सद्वारे त्याला धमकावण्यात आले. रिलायन्स फाऊंडेशनच्या हरकिशनदास हॉस्पिटलच्या नंबरवरुन हे कॉल्स आले होते. धमकीचे फोन आल्यानंतर डीबी मार्ग पोलिसांना तत्काळ याबाबतची माहिती देण्यात आली आणि त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली. त्याचवेळी पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पण, मुकेश अंबानींना इजा पोहोचवणं इतकं सोपं असेल का?, असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल. तर नाही, मुकेश अंबानींच्या सुरक्षेसाठी झेड प्लस सुरक्षेपासून ते अनेक शस्त्रधारी गार्ड तैनात असतात. अत्यंत चोख सुरक्षा व्यवस्था असते. आज आपण त्याचीच माहिती घेणार आहोत.

मुकेश अंबानींना Z+ सुरक्षा

-z-

देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांना Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सुमारे ५५ कमांडो प्रत्येक क्षणी तयार असतात. हे सुरक्षा गार्ड्स जर्मन बनावटीच्या हेकलर अँड कोच MP5 सब-मशीन गनसह अनेक आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असतात. जी एका मिनिटात ८०० राउंड फायर करू शकते. त्यांच्या तीन मुलांना महाराष्ट्र सरकारने दर्जेदार सुरक्षा दिली आहे. एका अहवालानुसार, Z+ सुरक्षेवर दरमहिना सुमारे २० लाख रुपये येतो.

NSG स्तरावरील १० कमांडोचाही समावेश

nsg-

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे अशा लोकांपैकी एक आहेत ज्यांना सरकारने झेड प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. या सुरक्षेत १० राष्ट्रीय सुरक्षा रक्षक स्तरावरील कमांडोचाही समावेश आहे. २५ सीआरपीएफ कमांडो टीममध्ये सामील आहेत. याशिवाय रक्षक, चालक, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी असे कर्मचारी असलेले शोध पथक आहे. हे कमांडो दोन शिफ्टमध्ये काम करतात. हे कमांडो प्रत्येकवेळी शस्त्रांनी सुसज्ज असतात. अंबानींच्या सुरक्षेमध्ये सामील असलेला प्रत्येक सैनिक मार्शल आर्ट आणि नि:शस्त्र लढाऊ कौशल्यांमध्ये निपुण आहे. अंबानींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या CRPF कमांडो दलात सशस्त्र रक्षक, सोबत असलेले रक्षक, चालक, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO), शोध पथक यांचा समावेश आहे.

इस्रायलमध्ये प्रशिक्षित २० खाजगी रक्षक

झेड प्लस सिक्युरिटी व्यतिरिक्त, मुकेश अंबानी यांनी त्यांची वैयक्तिक सुरक्षा देखील ठेवली आहे. यामध्ये त्यांच्यासोबत २० वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी आहेत, जे शस्त्राशिवाय प्रशिक्षित गार्ड्स आहेत. या सुरक्षा रक्षकांना इस्रायलमधील सुरक्षा-कंपनीने प्रशिक्षण दिले आहे. इस्रायली कमांडो आणि सैनिक नि:शस्त्र शत्रूला ठार करण्यात सक्षम असतात. त्यांना जगातील सर्वात धोकादायक मार्शल आर्ट्सपैकी एक क्राव मगाचं प्रशिक्षण दिले जाते. म्हणून कारणास्तव, इस्रायली कमांडो व्हीव्हीआयपी संरक्षणासाठी सर्वोत्तम मानले जातात. अंबानींच्या या टीममध्ये निवृत्त लष्कर आणि NSG जवानांचाही समावेश आहे. सीआरपीएफचे जवान अंबानींच्या घराभोवती संशयास्पद हालचाली किंवा व्यक्तींवर लक्ष ठेवतात.

एकूण खर्च किती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये झेड प्लस सुरक्षेचा खर्च सरकार उचलत असले तरी मुकेश अंबानी या सगळ्यापेक्षा वेगळे आहेत. मुकेश अंबानी स्वतः Z+ सुरक्षेचा खर्च उचलतात. ज्यावर दरमहा १५ ते २० लाख रुपये खर्च होतो. या खर्चामध्ये त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे पगार, त्यांची तैनाती आणि सुरक्षेत तैनात असलेल्या वाहनांच्या खर्चाचा समावेश आहे. सुरक्षेच्या खर्चाव्यतिरिक्त, अंबानींना सुरक्षा कर्मचार्‍यांसाठी बॅरेक्स देखील द्याव्या लागतात, ज्यात त्यांचे निवासस्थान, स्वयंपाकघर आणि शौचालय यांचा समावेश आहे. त्याच वेळी, एकूण खर्च ३५ लाखांच्याजवळपास असतो. अशा परिस्थितीत अंबानी आपल्या सुरक्षेसाठी दरमहिन्याला सुमारे ३५ लाख रुपये खर्च करतात.

Z+ सुरक्षा असलेले भारतातील पहिले उद्योगपती

z-

मुकेश अंबानी हे देशातील पहिले उद्योगपती आहेत ज्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. २०१३ मध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. त्यांना हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेकडून धमक्या मिळाल्या होत्या, त्यानंतर केंद्र सरकारने त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, नंतर त्याला Z+ मध्ये बदलण्यात आले. पण, मुकेश अंबानी यांच्या Z+ सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल दाखल करण्यात आली होती. नोव्हेंबर 2020 च्या सुरुवातीला, सर्वोच्च न्यायालयाने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला दिलेली Z+ सुरक्षा मागे घेण्याची मागणी करणारी याचिका करण्यात आली होती, जी न्यायालयाने फेटाळून लावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here