जळगाव: तालुक्यातील जुना कडगाव रोडवरील शेतात संदेश लिलाधर आढाळे नावाच्या तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा नशीराबाद पोलिसांनी उलगडा केला असून खून करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना सोमवारी दुपारी गावातून ताब्यात घेण्यात आले आहे. बहिणीची छेड काढत असल्याने खून केल्याची कबुली अल्पवयीन मुलांनी पोलिसांसमोर दिली आहे.

जळगाव तालुक्यातील भादली ते जुना कडगाव रोडवरील पाटचारीला लागून असलेल्या शेतात संदेश आढाळे या तरुणाचा १० ऑगस्टला सकाळी ७ वाजता मृतदेह आढळून आला होता. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याने त्याचा खून झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी मयत संदेशच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नशीराबाद गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटस्फोटाचा अर्ज, फॅमिली कोर्टानं समजावलं; बाहेर येताच पतीनं टोकाचं पाऊल उचललं
घटना घडल्यापासून भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी प्रकरणात जातीने लक्ष घातले होते. संदेशचे मित्र कोण, त्याच्याशी कोणाचे वाद आहेत काय, यासह त्याला घटनेच्या दिवशी शेवटचा कॉल कोणाचा आला होता, याची संपूर्ण माहिती पोलिसांनी संकलित करण्यात आली होती. या माहितीच्या आधारावर दोन अल्पवयीन मुलांनी हा खून केल्याचे निष्पन्न आले होते. त्यानुसार नशीराबाद पोलिसांनी सोमवारी दोघा मुलांना ताब्यात घेतले. दोघांची चौकशी केली असता, मयत संदेश हा बहिणीला त्रास देत होता. या कारणावरुन त्यास जीवे मारल्याची कबुली अल्पवयीन दोन्ही मुलांनी पोलिसांसमोर दिली. दोघांकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले असून दोघांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here