गुडफेलोज नावाच्या स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक करत असल्याची घोषणा रतन टाटांनी आज केली. गुंतवणुकीचा आकडा मात्र टाटांनी सांगितलेला नाही. गुडफेलोज हे ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातलं पहिलं कम्पॅनियनशिप स्टार्टअप आहे. तरुण आणि शिक्षित पदवीधरांच्या मदतीनं ज्येष्ठ नागरिकांची मदत करणं हा या स्टार्ट अपचा हेतू आहे. मुंबईसह पुणे, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये लवकरच गुडफेलोज सुरू होईल.
भारतात ५ कोटी वृद्ध एकटे राहतात. आयुष्याच्या जोडीदाराचं निधन, कौटुंबातील सदस्यांनी दूर लोटल्यानं अनेकांवर एकटं राहण्याची वेळ आली आहे. गुडफेलोजचं बिझनेस मॉडल एक फ्रीमियम सब्स्क्रिब्शन मॉडल आहे. सुरुवातीला पहिला महिना ज्येष्ठांना ही सेवा मोफत वापरता येईल. दुसऱ्या महिन्यानंतर ज्येष्ठांना नाममात्र सदस्यत्व शुल्क द्यावं लागेल. गुडफेलोजच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना शॉर्ट टर्म इंटर्नशिपसोबतच रोजदारदेखील मिळवून देईल.