राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये ३२ कंपन्यांचे शेअर्स आहेत. त्यात टायटन, ज्युबिलेंट फार्मा, स्टार हेल्थ, मेट्रो ब्रँड्स, टाटा मोटर्स, नजारा टेक्नॉलॉजी, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा मोटर्स या शेअर्सचा समावेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलियोमध्ये आहे.

 

rakesh 1
राकेश झुनझुनवाला
मुंबई: बिग बुल नावानं प्रसिद्ध असलेले दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं रविवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. फोर्ब्स मासिकानं दिलेल्या आकडेवारीनुसार राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती ५.८ अब्ज डॉलर इतकी होती. ते देशात श्रीमंतांच्या यादीत ४८ व्या स्थानी होते. झुनझुनवाला त्यांच्या मागे ३० हजार कोटी रुपयांचे शेअर्स मागे सोडून गेले आहेत.

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये ३२ कंपन्यांचे शेअर्स आहेत. त्यात टायटन, ज्युबिलेंट फार्मा, स्टार हेल्थ, मेट्रो ब्रँड्स, टाटा मोटर्स, नजारा टेक्नॉलॉजी, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा मोटर्स या शेअर्सचा समावेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलियोमध्ये आहे. या शेअर्सचं पुढे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एखाद्या शेअरहोल्डरचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याकडे असलेले स्टॉक आणि शेअर्स नॉमिनीला मिळतात. त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र द्यावं लागतं. ते नोटरी किंवा गॅझेटेड अधिकाऱ्याकडून अटेस्ट करावं लागतं.
एकच नंबर! सावलीसारखी सोबत करणाऱ्या तरुणाच्या भन्नाट संकल्पनेवर रतन टाटा फिदा; फंडिंगची घोषणा
नॉमिनेशन फॉर्म एनएसडीएल किंवा सीडीएसएलमध्ये नोंदणीकृत असायला हवं. नॉमिनी हा ट्रस्टी असतो, मालक नसतो. मृत व्यक्तीनं मृत्यूपत्र तयार केलं असल्यास शेअर्सची वाटणी त्याप्रकारे होते. मृत्यूपत्र नसल्यास हिंदू उत्तराधिकर कायद्याच्या आधारे त्याच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये शेअर्सची वाटणी केली जाते.

झुनझुनवाला यांनी सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. त्यांनी त्यांची संपत्ती पत्नी रेखा आणि तीन मुलांच्या नावे केली आहे. यात लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्यांमधील डायरेक्ट होल्डिंगसह स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. व्यवसायिक आणि कुटुंबातील सदस्य त्यांच्या संपत्तीची काळजी घेतील.
तुम्ही होऊ शकता पुढचे राकेश झुनझुनवाला, हे आहेत गोल्डन टिप्स
प्रकृतीच्या कारणास्तव झुनझुनवाला यांनी गेल्या वर्षी बहुतांश कंपन्यांमधील संचालक मंडळावरील पद सोडलं होतं. झुनझुनवाला यांची गुंतवणूक कंपनी रेअर इंटरप्रायझेसची जबाबदारी आता उत्पल शेठ आणि अमित गोयल यांच्या नेतृत्त्वाखालील व्यवस्थापन चालवेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here