याआधी या अनिष्ट रुढींबाबत मासिक सभा, विशेष महिला सभा घेऊन जनजागृती केली आहे. या रुढी व प्रथा या सर्वांचा स्त्रियांच्या सामाजिक जीवनावर कशाप्रकारे विपरीत परीणाम होतो, याबात माहिती देण्यात आली. घटनेने महिलांना दिलेले अधिकार व स्वातंत्र्याला यामुळे कसा पायबंद घातला जातो. याची जाणीव करून देण्यात आली. ही प्रथा बंद होणे का गरजेचे आहे व पुढील पिढीस तो आदर्श कसा ठरेल हे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. सती प्रथेसारख्या प्रथा बंद करून समाजात जो बदल घडला याबाबतही माहिती सांगण्यात आली.
याविषयी तेरेवायंगणी गावचे मार्गदर्शक व शिवनेरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक शिगवण, ग्रामविकास मंडळ अध्यक्ष किरण शिगवण श्री.डी.आर. जाधव, राजन जाधव व सरपंच मनोहर करबेले ग्रामसेवक मानसी साळुंके यांनी मार्गदर्शन केले. हा बदल घडवणारा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच डी.एल.कोळंबे, सदस्य नानु भडवलकर, अनिल जाधव, संगीता शिगवण मनस्वी फडकले आदी ग्रामस्थ यांचे योगदान लाभले. कार्यक्रमासाठी व ग्रामसभेसाठी मंडल अधिकारी सुदर्शन खानविलकर ,निवास जाधव, तानाजी शिगवण आदी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या ग्रामसभेला उपस्थित असलेल्या विधवा समजल्या जाणाऱ्या महिलांना हळदीकुंकू लावून आणि गुलाबाचे फुल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यापुढे गावात कोणत्याही विधवा महिलांचा अपमान होणार नाही आणि कोणतेही रूढ आणि परंपरांमध्ये ही बाब येणार नाही. याबाबत दक्षता घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या. या ग्रामसभेच्या ऐतिहासिक ठरावाचे ग्रामस्थांनी व महिलांनीही स्वागत केले.
१ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट इयरबड्स, सिंगल चार्जमध्ये अनेक तास ऐकू शकता