मुंबई: भारतरत्न दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावानं मुंबईत आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता. या संदर्भात नवे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत. लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

प्रमाणपत्र कोर्स
जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरत्या जागेची सुविधा उपलब्ध करून तातडीनं यावर्षी किमान प्रमाणपत्र कोर्स सुरू करावा. त्यानंतर टप्याटप्यानं पदविका आणि पदवी कोर्स सुरू करण्यात यावेत. हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आहे. तेवढेच दर्जेदार महाविद्यालय असले पाहिजे आणि तातडीनं सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जेष्ठ गायिका उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, समितीचे सदस्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

खरा हिरो! लाल सिंह चड्ढाच्या अपयशानं आमिर खानला बसला धक्का, अभिनेत्यानं घेतला मोठा निर्णय
लता दीदींचं स्वप्न
आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचं भारतरत्न लता मंगेशकर यांचं स्वप्न होतं. भारतात दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय असावे असे लता मंगेशकर यांचे स्वप्न होते. कलिना कॅम्पससमोर असं विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं यापूर्वीच घेतला होता. त्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. त्यानंतर याच समितीनं आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचं नाव भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असं असावं असा प्रस्ताव दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here