Aaditya Thackeray vs Eknath Shinde camp | काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून वातावरण तापवले होते. शिवसंवाद यात्रेतील आदित्य ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी होताना दिसत होती. परंतु, मध्यंतरी आदित्य ठाकरे आजारी पडल्यामुळे त्यांच्या शिवसंवाद यात्रेत खंड पडला होता. मात्र, आता आदित्य ठाकरे यांची प्रकृती सुधारली असून ते पुन्हा एकदा दौऱ्यांना सुरुवात करणार आहेत.

हायलाइट्स:
- आदित्य ठाकरेंचं ट्विट
- अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात द्वंद्व
- विधानसभेत शिवसेनेतील दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर काय घडणार,
आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमधून शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा ‘गद्दार’ म्हणून डिवचले आहे. काही गद्दार आमदारांची भाषा ऐकून, प्रश्न पडतो की गुंडगिरी आणि सत्तेची नशा एवढी आहे का, की त्यांच्या नव्या पक्षाचा आणि सरकारचा अंकुश नाही? जनतेला अशा भाषेत धमकावून काय सांगायचं आहे? हा सत्तेचा माज आहे की, काही न मिळाल्याचे नैराश्य?, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या आमदारांवर तुटून पडणार का, हे पाहावे लागेल.
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून वातावरण तापवले होते. शिवसंवाद यात्रेतील आदित्य ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी होताना दिसत होती. परंतु, मध्यंतरी आदित्य ठाकरे आजारी पडल्यामुळे त्यांच्या शिवसंवाद यात्रेत खंड पडला होता. मात्र, आता आदित्य ठाकरे यांची प्रकृती सुधारली असून ते पुन्हा एकदा दौऱ्यांना सुरुवात करणार आहेत. आदित्य ठाकरे बुधवारी शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांची निष्ठा यात्रा बुधवारी सायंकाळी ४ वाजता महाडमध्ये दाखल होतील,अशी माहिती शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगुणे यांनी दिली आहे.
सत्तास्थापनेनंतर महाडमध्ये प्रथमच शिवसेनेची सभा होत आहे. शिंदे गटाचे प्रतोद असलेल्या भरत गोगावले यांचा या मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात समावेश झाला नसला तरी दुसऱ्या टप्प्यात त्यांचे नाव निश्चित असल्याचे मानले जाते भरत गोगावलेही शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. गोगावले यांनी महाडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली होती.गेली तीन टर्म आमदार असलेले गोगावले यांचा महाड विधानसभा मतदारसंघात उत्तम संपर्क आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network