अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळ श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरला धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर येथे एनडीआरएफची प्रत्येकी एक टीम तैनात करण्यात आली होती. मात्र हवामान खात्याने आज दिलेल्या ताज्या माहितीनुसार आता हे वादळ अलिबागला धडकणार आहे. त्यामुळे अलिबागला एनडीआरएफच्या आणखी दोन टीम तैनात करण्यात आल्या असून सध्या अलिबागमध्ये एनडीआरएफच्या चार टीम तैनात असल्याचं जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितलं.
दरम्यान, मुंबई, कोकणासह दक्षिण गुजरापर्यंत निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्ट्यांवर एनडीआरएफच्या १५ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. श्रीवर्धन येथे आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर श्रीवर्धन येथे पावसाला सुरुवात झाली आहे. वादळाचा धोका पाहता मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines