Mohit Kamboj Ajit Pawar | राज्यातील सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेची अवस्था फारशी चांगली नसल्यामुळे या अधिवेशनात विरोधकांची संपूर्ण मदार अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे. मात्र, अधिवेशनापूर्वीच त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई होण्याचे संकेत मिळाल्याने पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

हायलाइट्स:
- मोहित कंबोज यांनी बुधवारी सकाळी काही नवी ट्विटस केली
- हर हर महादेव ! अब तांडव होगा
- आता राज्यातील कोणत्या नेत्यावर कारवाई होणार
मोहित कंबोज यांनी बुधवारी सकाळी काही नवी ट्विटस केली. यामध्ये कंबोज यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हर हर महादेव ! अब तांडव होगा !. तर दुसऱ्या ट्विटमध्ये कंबोज यांनी अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत यांची नावं लिहली आहेत. त्यानंतर कंबोज यांनी पाचवी जागा रिक्त सोडली आहे. याठिकाणी लवकरच एका नेत्याचा नंबर लागेल, असे संकेत मोहित कंबोज यांनी दिले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोणत्या नेत्यावर कारवाई होणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री केलेल्या ट्विटमध्ये सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. मोहित कंबोज यांच्या या वक्तव्याचा रोख अजित पवार यांच्या दिशेने असल्याचे सांगितले जाते. मोहित कंबोज यांचा आजवरचा लौकिक पाहता त्यांनी भाकीत केलेले बहुतांश नेते तुरुंगात गेले आहेत. त्यामुळे आता कारवाईच्या भीतीने पावसाळी अधिवशेनात अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर जाऊ शकतात, अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेची अवस्था फारशी चांगली नसल्यामुळे या अधिवेशनात विरोधकांची संपूर्ण मदार अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे. मात्र, अधिवेशनापूर्वीच त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई होण्याचे संकेत मिळाल्याने पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
मिटकरींची कंबोज यांच्यावर टीका
मोहित कंबोज हा ब्रह्मज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का. याला कसं माहिती पडतं की ईडी आणि सीबीआय कुठे कारवाई करणार आहे. हा ईडी कार्यालयात पुर्णवेळ बसणारा नेता आहे का, याचीही चौकशी झाली पाहिजे. मोहित कंबोज हा फक्त भाजपचा भोंगा आहे. त्याला दुसरं काहीही जमत नाही. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर चर्चा भरकटवण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network